सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गातील (Sindhudurga) वेंगुर्ल्यामध्ये मासेमारी (Vengurla Boat Capsize) करणारी एक बोट (Boat) उलटली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत बोटीतील सात मच्छिमारांपैकी दोन जणांचा मृत्यू (Died) झाला असून दोन मच्छिमार बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या 48 तासांमध्ये नदी पात्रात, विहिरीत बुडून आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारी बर्फाची वाहतूक सुरू होती. त्याचवेळी अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भरसमुद्रात ही बोट हेलकावे घेऊ लागली. पण वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने ही बोट पाण्यात बुडाली. या दुर्घटनेवेळी बोटीमध्ये एकूण सात मच्छिमार होते. यातील सात मच्छिमारांपैकी तिघांनी पोहून किनारा गाठल्याने ते बचावले. मात्र उर्वरित चौघांपैकी दोन जणांचे मृतदेह सापडले. उरलेल्या दोन जणांचा शोध सुरू शोध असल्याची माहिती देण्यात आली आहे. बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी एक खलाशी रत्नागिरीतील तर तीन खलाशी मध्यप्रदेशातील असल्याचे समजते.