7.8 C
New York

Shah Rukh Khan: किंग खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; रातोरात गाठली मुंबई!

Published:

२१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) केकेआर संघाने बाजी मारली. यानंतर संपूर्ण संघासोबत शाहरुखने धमाकेदार सेलिब्रेशन केलं. त्यानंतर, शाहरुख रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील ITC नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला, जिथे या सगळ्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. बुधवारी सकाळी शाहरुखची तब्बेत बिघडली. प्राथमिक उपचारात उष्माघाताच्या त्रासामुळे शाहरुखची तब्बेत बिघडल्याचं सांगण्यात आलं होतं.

परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर किंग खानला अहमदाबादच्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यावर अभिनेत्याची पत्नी गौरी खान, मॅनेजर पूजा ददलानी, अभिनेत्री व केकेआर संघाची सहमालक जुही चावला आणि तिचे पती असे सगळेजण शाहरुखची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. शाहरुखची प्रकृती बिघडल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्याचे लाखो चाहते चिंता व्यक्त करत होते. अखेर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने एक्स पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याचं सांगितलं होतं. आता शाहरुखला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळावल्यावर शाहरुख खानने अहमदाबादहून रातोरात मुंबई गाठली. यावेळी पत्नी गौरी खान व त्याची मॅनेजर पूजा देखील उपस्थित होती.


सध्या अभिनेत्याचा मुंबईत परतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, यामध्ये त्याच्या टीमने शाहरुख गाडीत बसत असताना छत्री धरल्याने त्याची झलक स्पष्टपणे दिसली नाही. फक्त गौरी आणि पूजा गाडीत बसल्याचं स्पष्टपणे बघायला मिळत आहे. रविवारी होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्याला शाहरुख उपस्थिती लावणार की नाही याकडे त्याच्या तमाम चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. बुधवारी केकेआर संघाची सहमालक जुही चावलाने ‘न्यूज १८’ शी संवाद साधताना शाहरुख अंतिम सामन्याला नक्की येईल असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय शाहरुखची प्रकृती सुधारली असल्याचं देखील अभिनेत्रीने यावेळी सांगितलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img