छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजी नगर (Sambhaji Nagar Crime) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्न करून देत नसल्याच्या वरून दोन मुलांनी आपल्या वडिलांची हत्या केली असल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर मधील वाळुंज एमआयडीसी (MIDC Police Station) पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाडगाव कोल्हाटी येथे ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाडगाव तलाठी येथे राहणाऱ्या संपत वाहुळ या 48 वर्षीय वडिलांची हत्या करण्यात आली आहे. संपत यांचे दोन मुलागा पोपट वाहुळ आणि प्रकाश वाहुळ या दोघांनीही आपल्या वडिलांना चाकूने वार करून हत्या केली आहे. वडील संपत वाहुळ यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगा पोपट वाहुळ आणि प्रकाश वाहुळ ही दोन्ही मुले एका कंपनीत काम करत होती. तर वाहुळ यांच्या नावावर शेती होती. 8 मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला. त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होती. कामावर आलेल्य प्रकाश रागात होता. कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर कामवरील बुटाने वडिलांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला. त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे, तरी सुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही, अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही, असे सांगितले. मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले. दोन्ही मुले बापावर तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्याासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने पकडले आणि लहान मुलाने त्यांच्यावर वार केले.