3 C
New York

Pune Accident : गाडी वेदांत नव्हे तर ड्रायव्हर चालवत होता- विशाल अग्रवाल

Published:

पुणे

पुण्यात 19 मे रोजी झालेल्या कार अपघातामध्ये (Pune Accident) तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल याला तत्काळ जामीन मिळाल्यानंतर या प्रकरणात पुणे पोलिसांवर मृत्यू झालेल्या तरुण आणि तरुणींच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर विरोधकांनी देखील या प्रकरणात पोलिसांवर आरोप लावल्यानंतर पोलिसांकडून वेदांत अग्रवाल मिळालेली जामीन रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर वेदांतला बाल सुधारक कारागृहात पाठवण्यात आले आहे. मात्र आता या प्रकरणात नवीन माहितीसमोर आली असून बिल्डरच्या पुत्राला वाचवण्याकरिता गरीब ड्रायव्हरला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 19 एप्रिल रोजी रात्री वेदांत अग्रवाल याच्या गाडीच्या धडकीने तरुण तरुणी यांच्या मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांकडून ड्रायव्हरचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यावेळी वेदांत अग्रवाल गाडी चालवत असल्याचं ड्रायव्हरने पोलिसात दिलेल्या जबाब म्हटले आहे. मात्र आता विशाल अग्रवाल यांच्या कडून देण्यात आलेल्या जबाब मध्ये त्या घटनेच्या वेळी ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ड्रायव्हर खोटं बोलत असल्याचे देखील सांगण्यात आलेलं आहे. पुढील विशाल अग्रवाल नंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल याने पोलिसांना दिलेल्या जबाब म्हटले आहे की गाडी मी नव्हे तर ड्रायव्हर चालवत होता असा जबाब दिला आहे. तथा पोलिसांकडून वेदांत अग्रवाल गाडी चालवत असल्याचे पुरावे सापडण्याचे काम सुरू केले आहे. आज या प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी संपणार आहे.

पोलिसांनी या दाव्यामुळे अग्रवालचे घर ते बार व जिथे जिथे ही कार गेली होती त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी करण्यात आली आहे. ड्रायव्हरचा जबाब नोंदविला आहे. यात बाळाने जेव्हा गाडी चालविण्यास मागितली तेव्हा ड्रायव्हरने मालकाला फोन करून विचारणा केली होती. यावर मालकाने आपल्या बाळाला गाडी चालवायला दे असे सांगितले होते, असा जबाब नोंदविण्यात आला आहे. बिल्डर मालकाच्या सांगण्यावरून मुलाला गाडी चालवायला दिल्याचेही या ड्रायव्हरने यात म्हटले होते. या प्रकरणात आता पोलीस ड्रायव्हरलाच न्यायालयात साक्षीदार म्हणून हजर करणार आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img