19.7 C
New York

Sharad Pawar : पुणे अपघात प्रकरणी पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले

Published:

राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय बनलेला पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Car Accident Case) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील भाष्य केले आहे. आज शरद पवार मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर (YB Chavan Centre) येथे एका आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पीक कर्जाचे पुर्नगठन, विमा कंपन्यांची नुकसान भरपाई देण्यासंबंधीची टाळाटाळ तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चारा छावण्या सुरू करणे आदी विषयांवर राज्य सरकारचे लक्ष वेधले.

Sharad Pawar मला प्रत्येक गोष्टीवर भाष्य करण्याची गरज नाही

याच बरोबर त्यांना पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत का नाही? असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले, या प्रकरणात ते का बोलत नाही हे त्यांनाच विचार असं शरद पवार म्हणाले. तर या प्रकरणात आरोपींच्या वकिलांशी आपलेही संबंध असल्याच्या चर्चा आहेत असं देखील शरद पवारांना विचारण्यात आले होते, यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले, जर मी एखाद्या वकिलाला भेटलो असेल तर त्याचा संबंध याच्याशी लावता तुम्ही.. मला प्रत्येक गोष्टीवर भाष्य करण्याची गरज नाही, या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडली हे दिसल्यानंतर उगीच याला वेगळे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही असं शरद पवार म्हणाले.

दुष्काळी परिस्थिती वरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांची देखील पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img