16.9 C
New York

Naxalites Encounter : गडचिरोलीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा

Published:

गडचिरोली

गडचिरोली (Gadchiroli) मधील नक्षलग्रस्त भागामध्ये पोलीस आणि नक्षल (Naxalite) मध्ये झालेल्या चकमकीत आठ नक्षली ठार (Naxalites Encounter) झाल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील नारायणपूर मध्ये चकमक झाली आहे. या कारवाईत तीन जिल्ह्यांतील पोलीसही सहभागी झाले होते, हे संयुक्त ऑपरेशन होते. डीआरजी, बस्तर फायटर आणि एसटीएफच्या 800 जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर अबुझमाडच्या सीमावर्ती भागातील रेकाव्याच्या जंगलात कालपासून सुरू असलेली पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक संपली. या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या सर्वांचे मृतदेह सापडले असून चकमकीनंतर पोलीस व सैन्याचे जवान मृतदेह घेऊन मुख्यालयाकडे परतत आहेत. मुख्यालयात जाण्यासाठी सैनिक इंद्रावती नदी पार करतानाचे व्हिडिओतून दिसून येत आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर या तीन जिल्ह्यांच्या संयुक्त सुरक्षा दलामुळे हे यश मिळाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img