बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या भीमकांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. परंतु अभिनयासोबत नवाजुद्दीन वेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. आता, नवाजुद्दीन सिद्दीकी त्याचा भाऊ अयाजुद्दीन मुळे चर्चेत आला असून त्याच्या मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
२२ मे रोजी नवाजुद्दीनच्या भावाला उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून बुधना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाच्यावतीने बेकायदेशीरपणे आदेश पत्र जारी केल्याचा आरोप नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर आहे.
किंग खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; रातोरात गाठली मुंबई!
नवाजुद्दीनच्या भावाने जावेद इक्बाल नावाच्या व्यक्तीसोबत शेतजमिनीच्या वादातून हे कृत्य करण्यात आले. जारी केलेला आदेश हा बनावट असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यात आली. अयाजुद्दीनविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
नवाजुद्दीनचा भाऊ अडचणीत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2018 मध्ये अयाजुद्दीनवर सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह फोटो शेअर करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला होता. याबाबत अयाजुद्दीनने सांगितले की, “एका व्यक्तीने भगवान शिवाचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले होते, मी त्याच्याशी याबद्दल बोललो आणि लिहिले की तुम्ही अशा पोस्ट शेअर करू नका ज्यामुळे एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावतील. मात्र, माझ्याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.