3.6 C
New York

Elections : ‘या’ चार जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections) करता राज्यातील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Elections) निकालाची प्रतीक्षा 4 जून पर्यंत करावी लागणार आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) शिक्षक आणि पदवीधर संघाच्या चार जागेची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण पदवीधर (Konkan Graduate Constituency) मतदारसंघात तसेच नाशिक (Nashik) आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाकरिता 26 जून रोजी मतदान होणार आहे.

राज्यातील लोकसभा निवडणूक पार पडली असली देशात अद्याप दोन निवडणूका बाकी आहेत. त्या पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. याआधी या निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली. मात्र आता राज्यातील निवडणुका पार पडल्यामुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 31 मे ते 7 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. यानंतर 10 जून रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी होईल आणि 12 जूनपर्यंत उमेदवारांना त्यांचा अर्ज मागे घेता येईल. यानंतर 26 जून रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img