21 C
New York

Ashok Saraf: अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव…

Published:

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना जाहीर झाला आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात 14 जून 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई च्या वतीने १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते.

यंदाच्या वर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. तसेच यावर्षी १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन केले. या सोहळ्यासाठी नाट्यरसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. कै. शाहीर साबळे, कै. सुधीर भट, कै. स्मिता तळवळकर आणि कै. आनंद अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाट्य परिषदेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

किंग खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; रातोरात गाठली मुंबई!

यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीसाठी देण्यात येणारे पुरस्कार कसे आहेत?

  • लीला मेहता पुरस्कृत भार्गवराम पांगे कार्यकर्ता पुरस्कार : गणेश तळेकर (नाट्य चळवळीसाठी विनामूल्य कार्याबद्दल)
  • डॉ. न. अ. बरवे स्मृती पुरस्कार – प्रशांत जोशी
  • कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार – शशांक लिमये (उत्कृष्ट निवेदक)
  • कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार – दीपाली घोंगे
  • बाळकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार – विजय जगपात (गुणी रंगमंच कामगार)
  • वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार – संजय देवधर (समीक्षा)
  • अ. सी. केळुस्कर स्मृती पुरस्कार – गोविंद गोडबोले (बालरंगभूमीवरील योगदान)
  • कै. विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती पुरस्कार – प्रायोगिक नाट्यसंस्था- अभिनय संस्था (कल्याण) – अभिजीत झुंझारराव

सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक – प्रणीत बोडके

  • नाट्य मंदार पुरस्कार – अशोक ढेरे
  • उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार – अशोक बेंडखळे
  • कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार – श्याम आस्करकर
  • विशेष पुरस्कार – स्व: रितेश सांळुके (कार्यकर्ता पुरस्कार)

सुनील बेंडखळे यांना लोककलावंत पुरस्कार

सुनील बेंडखळे यांना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा लोककलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे. या लोकप्रिय लोकनाट्याचे ते सूत्रधार ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ आहेत. या लोकनाट्याचे आतापर्यंत त्याने 450 प्रयोग सादर केले आहेत. सर्वच कलाकारांचं ज्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचं विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. 14 जून 2024 रोजी कलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img