बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे दीपिका चर्चेत असते. सध्या दीपिकाला तिच्या प्रेग्नंसीमुळे ट्रोल जातंय. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी रणवीर आणि दीपिका मुंबईत हजार झाले होते. तेव्हा दीपिकाचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये दिसणाऱ्या तिच्या बेबी बंपवरून तिला ट्रोल करण्यात येत आहे. सध्या प्रेग्नंसीवरून दीपिकावर प्रचंड टीका होतेय. इतकंच नव्हे तर ‘फेक बेबी बंप’ म्हणत तिला ट्रोल केलं जातंय. यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला होता. ट्रोलिंगनंतर आता दीपिका पहिल्यांदाच मुंबईतील एका स्टोअरमध्ये तिच्या ब्युटी ब्रँडच्या लाँचसाठी उपस्थिती दर्शवली. त्याचसोबतच तिने काही फोटो आणि व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत.
आज दीपिका इन्स्टाग्रामवर लाइव्ह आली. लाईव्ह येण्याआधी दीपिकाने काही फोटो स्टोरीमध्ये पोस्ट केले होते. तिने पिवळा ड्रेस परिधान केला असून तिचा बेबी बंपसुद्धा पहायला मिळत होता. तिच्या स्कीनकेअर ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी तिने व्हिडीओसुद्धा पोस्ट केले आहेत. तिच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही कमेंट्सचा पाऊस पाडला.
विकी-कतरिनाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल? व्हिडिओ आला समोर!
फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने चाहत्यांना प्रेग्नंसीची ‘गुड न्यूज’ दिली. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असल्याचं तिने म्हटलं होतं. तेव्हापासून दीपिकाचा बेबी बंप पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले होते. सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी दीपिका आणि रणवीर मुंबईतील मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी पहिल्यांदाच दीपिकाचा बेबी बंप पहायला मिळाला. मात्र त्यानंतर काहींनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
काही दिवसांपूर्वी जेव्हा दीपिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तिचा बेबी बंप न दिसल्याने तिला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र मे महिना उजाडला तरी दीपिकाचं पोट अजून कसं दिसत नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. तर काहींनी सरोगसीची शक्यता वर्तवली होती.