4.1 C
New York

Sharad pawar : बारामतीच्या निकालावर काय म्हणाले पवार?

Published:

राज्यात नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा 4 जूनच्या निकालाकडे लागलेल्या असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad pawar) बारामतीच्या निकालाबाबत मोठं विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा ट्विस्ट आला असून, दुसरीकडे महायुती आणि सुनेत्रा पवारांची (Sunetra Pawar) धाकधूक वाढली आहे. पत्रकार प्रशांत कदम यांना मुलाखतीत बोलताना पवारांनी हे विधान केले आहे.

Sharad pawar बारामतीच्या निकालावर काय म्हणाले पवार?

मुलाखतीत शरद पवारांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पवारांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरं दिली. पवारांना बारामतीच्या निवडणुकीत विजयाची खात्री आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही असे सांगितले. तसेच यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच व्हायचा नाही, पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाल्याचे नागरिक सांगत आहेत. पण या गोष्टीचा निकालावर किती परिणाम होईल हे आज सांगता येणार नसल्याचे पवारांनी सांगितले. पवारांचे हे उत्तर महायुतीची आणि सुनेत्रा पवार यांची धाकधूक वाढणारे आहे. त्यामुळे आता बारामतीत सुप्रिया सुळे की, सुनेत्रा पवार बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शरद पवारांच्या ‘या’ उत्तरानं पिक्चर क्लिअर..

Sharad pawar राज्यात मविआच बाजी मारणार

बारामतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्यानंतर पवारांनी राज्याच्या निकालावरही भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यात भाजपने 45 प्लसचे मिशन ठेवले आहे. परंतु, पार पडलेल्या मतदानच्या आकडेवारीवरून राज्यात मविआच बाजी मारणार असल्याचा दावा पवारांनी केला आहे. पवारांचा हा दावा महायुतीतील नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकवणारा तसेच धाकधूक वाढणारा आहे.

Sharad pawar साताऱ्यात पवारांनी सांगितला होता राज्याच्या निकाल

मध्यंतरी शरद पवारा यांची साताऱ्यात पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभेत राज्याचा निकाल कसा लागले याची आकडेवारी सांगितली होती. यात त्यांनी राज्यात मविआला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होता. त्यानंतर आता त्यांनी राज्यात मविआच बाजी मारेल असा पुनुरूच्चार केला आहे. तसेच बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही असे सुचक उत्तर दिले आहे. त्यामुळे आता 4 जूनला लागण्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img