23.1 C
New York

Weather Forecast : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची एलो अलर्ट

Published:

मुंबई

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता पुन्हा हवामान विभागाने (Weather Forecast) पुन्हा अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणेसह कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

अंदमान बेटावर मान्सून पोहोचल्यानंतर आता त्याचा राज्यातील वातावरणावर परिणाम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला आहे. पण मान्सूनचा एकंदर वेग पाहता राज्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी, कोकणातील चिपळून तालुक्यामध्ये अवकाळीचा जोर पाहायला मिळाला.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर, उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यासोबतच पुण्यातील तापमानात वाढ होणार असून जिल्ह्याला हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून सूर्याच्या किरणांचे चटकेही जाणवण्याची शक्यता आहे. तर दुपारच्यानंतर तापमानात वाढ होणार असून सायंकाळी मात्र, पुन्हा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. मुंबईतील वातावरणात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img