19.7 C
New York

Vishal Patil : विशाल पाटील वरून काँग्रेस- ठाकरेगटात जुंपली

Published:

सांगली

लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) राज्यातील सर्वात चर्चेचा लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेला सांगलीमध्ये (Sangli) निवडणुकीनंतर देखील शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray group) आणि काँग्रेस (Congress) मध्ये वाद समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी केलेल्या पक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांना काँग्रेसच्या स्नेहभोजनाला निमंत्रित केल्यामुळे ठाकरे गडाकडून काँग्रेसवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.

लोकसभा निवडणूक पार पडल्या नंतर सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी कडून आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसच्या वतीने आयोजित स्नेहभोजनाला महाविकास आघाडी विरोधात बंड करून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील त्यांना देखील निमंत्रित करण्यात आलं असल्याने यावरून ठाकरे गटाकडून काँग्रेसला हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच विशाल पाटील यांचे काँग्रेस मधून निलंबित करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांच्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्याने आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्याने या स्नेहमेळावाचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. तसेच या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने महाविकास आघाडीने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. याविरोधात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिका घेतली होती. स्थानिक काँग्रेसने विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. परंतु, उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे सांगलीची लढाई विशाल पाटील, चंद्रहार पाटील, संजयकाका पाटील अशी तिरंगी झाली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img