4.1 C
New York

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालचा नवा कारनामा उघड

Published:

पुणे अपघात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत (Pune Porsche Accident) आहेत. पोर्शे या आलिशान कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली. यानंतर अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली. त्याच्या वडिलांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. परंतु, या कारबाबत आता जी माहिती (Pune Car Accident) समोर आली आहे ती खरोखरच चीड आणणारी आहे. आरटीओनं या कारची नोंदणी तात्पुरती रद्द केली आहे. कारची नोंदणी १८ मार्चला झाली होती परंतु, नोंदणीसह अन्य शुल्क १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरली नसल्याने प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या कारची मालकी असलेल्या कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे.

Pune Porsche Accident कार कंपनीला नोटीस धाडण्याच्या हालचाली सुरू

कारची नोंदणी १७ सप्टेंबरपर्यंत वैध आहे. ही कार पुण्यात आणल्यानंतर १८ एप्रिलला नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करण्यात आला. येथे मोटार वाहन निरीक्षकांनी कारची तपासणी केली. नंतर नोंदणीसाठी १ हजार ७५८ रुपयांसह अन्य शुल्क भरले नाही म्हणून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता आरटीओने पुढील कारवाई करत संबंधित कार कंपनीला नोटीस धाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नोंदणी रद्द झाल्यानंतर पुढील बारा महिने नोंदणी करता येणार नाही.

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Pune Porsche Accident मुलाच्या वडीलांना कोर्टाने 3 दिवसांची पोलिस कोठडी

पुणे हिट अँड रन प्रकरणी (Pune Accident) अटकेत असलेल्या आरोपी कारचालक मुलाच्या वडीलांना कोर्टाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालची (Vishal Agarwal) कोर्टाने 24 मेपर्यंत पोलिस कोठडीत (Police Custody) रवानगी केली आहे. विशाल अग्रवाल याच्यासह बार मालक आणि व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांनासुद्धा पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवाल आजोबा ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या ब्रह्मा कॉर्पचे मालक आहेत. त्याची कन्स्ट्रक्शन कंपनी पुण्यात अनेक पंचतारांकित हॉटेल्स बांधण्यात गुंतलेली असताना, ब्रह्मा मल्टीस्पेस आणि ब्रह्मा मल्टीकॉन सारखे व्यवसायही अग्रवाल यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 17 वर्षीय विशालच्या मुलाने चालवलेल्या पोर्श कारने रविवारी पहाटे पुणे शहरातील कल्याणीनगर येथे दोघांचा जीव घेतला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img