17 C
New York

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालची पोलिसांसमोर कबुली

Published:

कल्याणी नगर परिसरात अलिशान गाडीने दोघांचा जीव घेणाऱ्या (Pune Porsche Accident) अल्पवयीन वेदांत अग्रवालचा काल (दि.22) जामीन रद्द करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तर, त्याचे वडील विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, विशाल अग्रवालने अल्पवयीन वेदांतला गाडी देऊन चूक केल्याची कबुली दिली आहे. पोलीसी चौकशीदरम्यान विशाल अग्रवाल यांनी ही कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.

Pune Porsche Accident वेदांतची बाल सुधार गृहात रवानगी

कल्याणी अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident) अल्पवयीन आरोपीचा जामीन काल (दि.22) रद्द करण्यात आला. त्यानंतर त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्याचे निर्देश बाल हक्क मंडळाने दिले असून, पोलिसांच्या तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवलं जाणार आहे. तोपर्यंत त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. कल्याणी नगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातानंतर वेदांतला बाल हक्क न्यायालयता हजर करण्यात आले होते. त्यावेळी तो अल्पवयीन असल्याने त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

विशाल अग्रवालचा नवा कारनामा उघड

Pune Porsche Accident सज्ञान म्हणून खटला चालवण्याची पोलिसांची मागणी

कल्याणी नगर मधील घटनेत दोघांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वेदांत अग्रवालला प्रौढ म्हणून परवानगी देऊन त्याच्यावर खटला चालवण्याची मागणी पुणे पोलिसांनी बाल हक्क न्यायालयात केली होती. मात्र, ती मान्य करण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुन्हा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर काल (दि.22) बाल हक्क न्यायालयाने वेदांतचा जामीन रद्द करण्याचे आदेश देत त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्याचे निर्देश दिले. पोलिसांच्या तपासानंतर तो सज्ञान आहे की अज्ञान हे ठरवलं जाणार आहे. तोपर्यंत त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात राहावे लागणार आहे.

Pune Porsche Accident अजब शिक्षेवर चहूबाजूंनी टीका

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात आलिशान कार चालवत दोघांना चिरडले. त्यानंतर अल्पवयीन मुलास बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला होता. तसेच 14 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याबरोबरच अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अजब शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या आदेशानंतर चहुबाजूकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img