देशात पाच टप्प्यात मतदान झालं आहे. आणखी दोन टप्प्यातील मतदान बाकी (Lok Sabha Election) आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी होणार आहे. मतदानानंतर निकाल काय असतील याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आम्हीच बाजी मारणार असे दावे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे (Sharad Pawar) मोठे वक्तव्य समोर आले आहे. भाजपला जर बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि त्यांनी तुम्हाला साद घातली तर काय करणार असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होत आहे.
Sharad Pawar उद्या संसदेत आम्ही एकमेकांशी बोलणार नाही
यंदाच्या निवडणुकीत भाजपला 272 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि त्यांनी तुम्हाला साद घातली तर तुमचा पक्ष त्यांच्या सोबत जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले, काही कारणच नाही. कारण त्यांची धोरणं आम्हाला पसंत नाहीत. आमचे संबंध व्यक्तिगत असतील. व्यक्तिगत सलोखा आणि राजकीय संबंध यात फरक आहे. उद्या संसदेत आम्ही एकमेकांशी बोलणार नाही असं नाही पण याचा अर्थ संसदेत मी त्यांच्या बाजूने हात वर करणार असे होत नाही.
OBC सर्टिफिकेटबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Sharad Pawar भाजपला सत्तेपासून दूर
शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांनी याआधीही भाजपबरोबर जाण्यास सहमती दर्शवली होती पण ऐनवेळी माघार घेतली असा दावा अजित पवार गटातील नेहमीच करत असतात. 2019 मध्ये शरद पवारांनी जसे उद्धव ठाकरेंच्या मदतीने भाजपला सत्तेपासून दूर केले. तसाच विचार त्यांच्या या ताज्या वक्तव्यामागे आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
अर्थात लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन टप्पे अजून बाकी आहेत. शेवटचा टप्पा १ जून रोजी आहे. त्यानंतर ४ जूनला निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या फक्त शक्यतांच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय निकाल लागणार, कोणता पक्ष विजयी होणार याची उत्सुकता आहे.