7.8 C
New York

SDRF Boat Mishap : बुडालेल्या तरुणाला शोधायला गेले; जीव गमावून बसले

Published:

SDRF Boat Mishap : प्रवरा नदीत बुडून एसडीआरएफच्या तीन जवानांचा मृत्यू

उजनी धरणात सहाजण बुडाल्याची घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आणखी एक दुर्घटना घडली आहे. प्रवरा नदीच्या पात्रात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या SDRF जवानांच्या बोटीला (SDRF Boat Mishap) अपघात झाला. यात बुडून तीन जवानांचा मृत्यू झाला असून आणखी तीन जवानांचा शोध सुरु आहे.

उजनी धरणात बुडालेल्या सहापैकी पाचजणांचे मृतदेह शोधण्यात शोध पथकांना यश आले आहे. ही घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बुद्रुक येथे बोट उलटल्याची दुसरी घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही बोट प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेताना उलटली आहे. अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे दोन तरुण पोहण्यासाठी प्रवरा नदीत गेले होते. हे दोघेही नदीत बुडाले. त्यापैकी एकाच मृतदेह हाती लागला आहे. दुसऱ्या तरुणाच्या शोधासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती निवारण दलाचे पथक मागवण्यात आले होते. हे पथक आज सकाळी दोन बोटी घेऊन तरुणाच्या शोधासाठी नदीपात्रात उतरले.

ममता बॅनर्जींना झटका, ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय


पण, काही वेळातच नदीत भोवरा निर्माण झाल्याने एक बोट उलटली. या बोटीत एसडीआरएफचे पाच जवान आणि एक स्थानिक तरुण असे सहा जण होते. त्यापैकी दोघांना वाचवण्यात आले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. वाचलेल्या दोघांपैकी अशोक पवार यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पंकज पवार हा तरुण सुखरूप आहे. प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या एसडीआरएफच्या तीन जवानांचे मृतदेह मिळून आले आहेत. बोटीत असलेला स्थानिक तरुण गणेश मधुकर देशमुख-वाकचौरे आणि ज्याच्या शोधासाठी पथक गेले तो अर्जुन जेडगुले या दोघांनाच शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img