5.5 C
New York

Priyanka Chopra : बुल्गारी इव्हेंटमध्ये झळकली ‘देसी गर्ल’

Published:

Priyanka Chopra in Hot Black Look: देसी गर्लचा हॉट फोटोशूट पाहिलात का ?

Priyanka Chopra in Hot Black Look: बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ (Desi Girl) प्रियांका चोप्रा जोनास तिच्या स्टाईलने आणि तिच्या फॅशनने चाहत्यांना घायाळ करत असते. आता परत एकदा प्रियांकाच्या ‘जलवा’ने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.

नुकताच पार पडलेला बुल्गारी इव्हेंट रोममध्ये पार पडला. त्यातले काही बोल्ड फोटोस प्रियांकाने शेअर केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये प्रियांका अतिशय सुंदर दिसत आहे. देसी गर्ल ने बुल्गारी इव्हेंटसाठी काळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता. स्लिव्हलेस ट्यूब स्टाईल अश्या गाउनमध्ये प्रियांका ग्लॅमरस दिसत होती.

तर पहिल्या दिवशी प्रियांकाने बुल्गारी इव्हेंटमध्ये क्रीम अँड ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊनमध्ये एन्ट्री घेतली. आणि तिच्या गळ्यात अतिशय महागडा असणारा डायमंड नेकलेस घातलेला दिसला. हा ‘Bvlgari’ ब्रँडचा सर्वात महागडा नेकपीस आहे. हा सुंदर असा हिऱ्याचा दागिना बनवण्यासाठी 2 हजार 800 तास लागले.

प्रियांकाच्या ह्या नेकपीसमध्ये ७ हिरे आहेत तर 200 कॅरेट हिऱ्यांचा समावेश असलेला या सुंदर नेकलेसची किंमत 43 मिलियन डॉलर अर्थात 358 कोटी रुपये आहे. सध्या सर्वत्र या महागड्या नेकलेसची चर्चा अफाट रंगली आहे.

प्रियांकाचा हा काळ्या रंगाचा ड्रेस लांबलचक आणि बॉडीहँगिंग असल्यामुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा ठरला. ह्या ड्रेसमधून प्रियांकाची फिगर पण फ्लॉट होताना दिसली. काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसबरोबरच तिने साइड पार्टीशन, थोडे कर्ल्स करून केस खुले सोडले आहेत.

प्रियांका चोप्राने अतिशय लाईट मेकअप आणि स्मोकी आयलाईनसह तिचा लूक पूर्ण केला. प्रियांकाने दिलेल्या पोजमुले तिचे सौंदर्य अजून खुलले आहे

प्रियांका चोप्रा नुकताच झालेला रोमँटिक ड्रामा ‘लव्ह अगेन’ यामध्ये दिसली. ह्यामध्ये तिच्यासोबत सेलिन डिऑन आणि सॅम ह्यूगन होते. प्रियांकाचा आगामी ‘हेड्स ऑफ स्टेट’ ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे त्यात जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्याही भूमिका आहेत. तसंच फ्रँक ई फ्लॉवर्सच्या ‘द ब्लफ’ ह्या चित्रपटात सुद्धा प्रियांका झळकणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img