26.2 C
New York

loksabha Election : ‘या’ मतदारसंघांत INDIA-NDA ची वाढणार ‘धाकधूक’

Published:

लोकसभा निवडणुकीत पाच टप्प्यांतील (loksabha Election) मतदान झाले आहे. आता सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी होणार आहे. भाजपकडून पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला जात आहे. यंदा 400 पेक्षा जास्त जागा मिळतील असाही दावा भाजप नेत्यांचा आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेते भाजप पराभूत होईल असा विश्वास व्यक्त करत आहेत. आता या लढाईत कोण उजवं ठरणार याचं उत्तर 4 जूनलाच मिळणार आहे. परंतु मागील निवडणुकीत असे काही मतदारसंघ होते जिथे उमेदवारांतल्या जय परजयाच अंतर अतिशय कमी राहिलं होतं. त्यामुळे आताही या मतदारसंघामुळे धाकधूक वाढणार आहेच.

काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघात दोन्ही उमेदवारांत जय पराजयातील अंतर फक्त 6 हजार 676 मतांचं होतं. अंदमान-निकोबार मध्ये काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा आणि विशाल जॉली यांच्यात लढत होती. यामध्ये कुलदीप शर्मा विजयी झाले होते. या दोन्ही उमेदवारांत मतांचं अंतर फक्त 1 हजार 407 इतकं कमी राहिलं होतं. पश्चिम बंगालमधील आरामबाग मतदारसंघात टीएमसीच्या अपरुपा पोद्दार विजयी झाल्या होत्या. त्यांनी विरोधी उमेदवार तपन कुमार राय यांचा फक्त 1 हजार 142 मतांच्या अंतराने पराभव केला होता.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील लढतही अटीतटीची झाली होती. येथे मत विभाजनाचा फायदा होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा 4 हजार 492 मतांनी पराभव केला होता. तेलंगणातील भोंगिर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कोमाटीरेड्डी वेंकट रेड्डी यांनी भारत राष्ट्र समितीच्या (आधी तेलंगण राष्ट्र समिती) बोरा नरसैया गौड यांचा 5 हजार 219 मतांनी पराभव केला होता. चामराजनगर मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे श्रीनिवास प्रसाद यांनी काँग्रेसच्या आर ध्रुवनारायण यांच्यातील लढतीत प्रसाद यांनी फक्त 1 हजार 817 मताधिक्याने विजय मिळवला होता.

तामिळनाडूतील चिदंबरम मतदारसंघात थोल थिरूमावलावन (vck) यांनी एडीएमकेचे चंद्रशेखर याचा 3 हजार 219 मतांनी पराभव केला होता. दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात भाजपाच्या लालुभाई बाबूभाई पटेल यांनी काँग्रेसच्या केतन दहयाभाई पटेल यांचा 9 हजार 942 मतांच्या फरकाने पराभव केला होता. आंध्र प्रदेशातील गुंटूर मतदारसंघात टीडीपी उमेदवार जयदेव गल्ला आणि वायएसआरसीपीच्या मोडूगुला वेणुगोपाल रेड्डी यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत जयदेव गल्ला यांनी रेड्डी यांच्यावर 4 हजार 205 मतांच्या फरकाने विजय नोंदवला. बिहारमधील जहानाबादमध्ये जेडीयू उमेदवार चंद्रेश्वर प्रसाद यांनी आरजेडीचे सुरेंद्र प्रसाद यादव यांचा अटीतटीच्या लढतीत 1 हजार 751 मतांच्या फरकाने पराभव केला. कांकेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मोहन मांडवी यांनी काँग्रेसच्या बिरेश ठाकूर यांना जोरदार टक्कर दिली. या निवडणुकीत मोहन मांडवी यांनी 6 हजार 914 अधिकची मते मिळवत विजय खेचून आणला. कोरापुटमध्ये काँग्रेसने बाजी मारली. येथे काँग्रेसच्या सप्तगिरी संकर उलाका यांनी शानदार प्रदर्शन करत भाजपाच्या कौसल्या हिक्का यांचा 3 हजार 613 मतांच्या फरकाने पराभव केला.

‘कमळ’ अन् ‘पंजा’चा इतिहास घ्या जाणून..

loksabha Election मछलीशह अन् लक्षद्वीप, लीड हजारांच्या आत

लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फैजल यांनी काँग्रेसच्या हमदुल्ला सईद यांचा फक्त 824 मतांच्या फरकाने पराभव केला. या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांतील लढत लक्षवेधी ठरली. मछलीशहर मध्ये भाजपाचे उमेदवार भोलानाथ आणि बसपाचे त्रिभुवन राम यांच्यात लढत होती. या निवडणुकीत भोलानाथ यांनी फक्त 181 मते अधिकची घेत विजय संपादन केला.
loksabha Election केंद्रीय मंत्र्यालाही फुटला घाम

उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघात भाजपचे राजेंद्र अगरवाल आणि बसपाच्या हाजी याकूब यांच्यात लढत होती. येथे अग्रवाल यांनी 4 हजार 729 मतांच्या फरकाने याकूब यांचा पराभव केला. खुंटी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते अर्जुन मुंडा यांना काँग्रेसच्या कालीचरण मुंडा यांनी कडवे आव्हान दिले होते. त्यामुळे अर्जुन मुंडा यांनी कसातरी 1 हजार 445 मतांनी विजय मिळवला.

loksabha Election अटीतटीच्या लढतीत एनडीएचा आव्वाज

याव्यतिरिक्त मुजफ्फरनगर, खुंटी, रोहतक, संबलपूर, श्रावस्ती, गोवा दक्षिण, श्रीकाकुलम, वेल्लोर, विजयवाडा, विशाखापट्टणम आणि जहिराबाद मतदारसंघात अटीतटीची लढत होती. या मतदारसंघातही विजयी आणि पराभूत उमेदवारांतील मतांचा फरक दहा हजारांपेक्षा कमी होता. अटीतटीच्या लढतीत मोठ्या संख्येने एनडीएचे उमेदवार विजयी झाले होते. 30 पैकी 15 मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचे उमेदवार 8 मतदारसंघात विजयी झाले. बाकी जागांवर एमआयएम, बसपा उमेदवारांनी विजय नोंदवला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img