18.3 C
New York

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण

Published:

सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आजच सराफा बाजार गाठा. (Gold Price) सोने-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दराने उसळी घेतली होती. परंतु सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून मोठी घट झाली आहे. त्यात सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. 1,090 रुपयांची 24 कॅरेट सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचे दर 73,420 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

Gold Price प्रतिकिलो चांदीचा दर हा 91 हजार रुपयांच्या खाली

सोन्यापेक्षा चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज चांदीच्या दरात तब्बल 2200 रुपयांची घसरण दिसून येत आहे. चांदीचा दर हा आज प्रतिकिलो 91 हजार रुपयांच्या खाली आला आहे. चांदी व्यतिरिक्त, वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीतही मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं आज 600 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सोन्याचा दर हा सराफा बाजारात 72,400 रुपयांच्या जवळ आहे. कालच्या तुलनेत आज वायदे बाजारात चांदीचा भाव 2,274 रुपयांनी घसरला आहे. सध्या चांदीचा दर हा 90,739 रुपये प्रति किलोवर आला आहे. बुधवारी बाजारात चांदीचा दर हा 93,013 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

Gold Price सोन्याच्या दरातही घसरण

एमसीएक्सवर सोन्याच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज एमसीएक्सवर सोने कालच्या तुलनेत 636 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. सध्या सोन्याचा दर हा 72,410 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 73046 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे.

Gold Price प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे

दिल्ली – 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

मुंबई – 24 कॅरेट सोने 73,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

कोलकाता – 24 कॅरेट सोने 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

चेन्नई – 24 कॅरेट सोने 73,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 97,000 रुपये प्रति किलो

पुणे – 24 कॅरेट सोने 73,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

जयपूर – 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

नोएडा – 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

लखनौ – 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

पाटणा – 24 कॅरेट सोने 73,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

गुरुग्राम – 24 कॅरेट सोने 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 92,500 रुपये प्रति किलो

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img