21 C
New York

Dombivli Midc : डोंबिवलीतील एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट

Published:

डोंबिवली

डोंबिवली एमआयडीसीमध्ये (Dombivli Midc) एका कंपनीत मोठा ब्लास्ट (Blast) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एमआयडीसी (MIDC) फेज दोनमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय. स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण आहे.

डोंबिवली एमआयडीसीमधील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी बॉलरलचा स्फोट झाला. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले. घटनास्थळी चार अग्नीशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीजवळ ह्यूदांई कंपनीचे शोरुम आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु सहा ते सात कामगार जखमी झाले आहे. या आगीनंतर केमिकल कंपनीच्या शेजारी असलेल्या कंपन्यांना धोका निर्माण झाला आहे.

केमिकल कंपनीला लागलेली आग इतर ठिकाणी पसरत आहे. या स्फोटामुळे कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या कामचा फुटल्या आहेत. आगीची घटना दोन किलोमीटर लांबून दिसत आहे. अनेक जण मोबाईलवर त्याचे शुटिंग करत आहेत. आग विझवणे हे अग्नीशमन दलापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img