4 C
New York

Dombivali Blast : डोंबिवली स्फोटवर फडणवीसांची प्रतिक्रिया

Published:

मुंबई

डोंबिवलीतील एमआयडीसीत (Dombivali Blast) केमिकल कंपनीत (Chemical Companies) झालेल्या भीषण स्फोटात (Blast) आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण गंभीर जखमीअसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केमिकल्स कंपन्यांबाबत (MIDC) मोठं विधान केलं आहे.

केमिकल्स कंपन्या डोंबिवलीतून हलवण्याबाबत अनेकदा आश्वासन दिली गेली, मात्र त्यावर काहीही कारवाई केली गेलेली नाही, असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, केमिकल्स कंपन्या एका दिवसात बाहेर काढता येत नाहीत. काही नवीन एमआयडीसी तयार केल्या जात आहेत, तिथे या शिफ्ट करण्याचं ठरवलं जाणार आहे. परंतु एका दिवसात इंडस्ट्री बंद करता येत नाहीत, असं फडणवीस म्हणाले.

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असल्याचं, फडणवीसांनी ट्वीट करत सांगितलं.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये अमुदान नावची एक कंपनी आहे. त्यामध्ये बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. डोंबिवलीतील घटनास्थळी बचावपथक दाखल झालं आहे. जिल्हाधिकारी आणि खासदार त्याठिकाणी पोहोचले आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img