3.8 C
New York

Arun Gawli : अरूण गवळीच्या सुटकेला राज्य सरकारचा विरोध

Published:

मुंबई

कुख्यात गुंड अरूण गवळी (Arun Gawli) यांच्या सुटकेला राज्य सरकारने विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur High Court) खंडपीठानं गृहविभागाला चार आठवड्यांमध्ये निर्णय घ्यायचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात गृहविभागानं सुप्रीम कोर्टात गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला विरोध केला आहे. मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात (Kamlakar Jamsandekar Murder Case) तसेच, इतर गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळीला दोन वेळेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

वास्तविक लोकसभा निवडणुकीच्या आधी अरुण गवळीची सुटका झाल्यामुळे महाआघाडीच्या नेत्यांनी भाजपवर आरोप देखील केले होते. आता गृहविभागाने या विरोधात याचिका दाखल केल्यामुळे अरुण गवळी यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

कुख्‍यात डॉन अरुण गवळी 80 आणि 90 च्‍या दहशकात मुंबईतील भायखळा या स्‍लम एरियात राहून घरोघरी दूध पोहोचवण्याचे काम करत होता. पुढे आपल्या क्रुर कृत्यामुळे तो गुन्हेगारी जगताचा बादशाह झाला. आता डॅडी या नावाने त्‍याची ओळख असून तो शिवसेनेच्‍या नगरसेवकाच्‍या खुन प्रकरणात तो शिक्षा भोगत आहे. एक सामान्‍य कुटुंबातील मुलगा ते अंडरवर्ड डॉन असा त्याचा प्रवास आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img