21 C
New York

Dombivali Blast : डोंबिवली एमआयडीसीतील स्फोटात 6 जणांचा मृत्यू

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

डोंबिवलीतील एमआयडीसीत (Dombivali Blast) केमिकल कंपनीत (MIDC) झालेल्या भीषण स्फोटात (Blast) आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक जण गंभीर जखमीअसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर, उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेही घटनास्थळी पोहोचले होते.

डोंबिवलीजवळील एमआयडीसीजवळील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलट स्फ़ोट झाल्याने शहर हादरले. गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूकडील कंपनीत कर्मचारी बाहेर आले होते.घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते.मात्र आग इतकी मोठी होती कि आगीच्या ज्वाळा दुरपर्यत दिसत होत्या. या घटनेत अनेक कर्मचारी जखमी झाले असून चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेची माहिती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत डोंबिवलीत घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दुपार वेळी डोंबिवलीजवळील सोनारपाडा जवळील हार्डीमर बनविणारी अमुदान केमिकल कंपनीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला.स्फ़ोटाचा इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसरातील इमारती, दुकाने यांच्या काचा फुटल्या.कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे नागरिक घाबरून घराबाहेर होते.या घटनेची माहिताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे सहा ते सात बंब व पालिकेचे सात ते आठ पाणी टॅंकर आले.आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले.मात्र पाच ते सहा तास आगीच्या ज्वाऴादूरवर दिसत होत्या.या स्फोटात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ कर्मचाऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहीती मिळताच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत , खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील, भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष नाना सुर्यवंशी, कृष्णा परुळेकर, दमयंती भानुशाली, शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, मनीषा राणे,शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, विवेक खामकर, तुषार शिंदे, मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, मनवीसे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, प्रेम पाटील यांसह अनेक पदाधिकारी, कामा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.देवेन सोनी ,उदय वालावलर, महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर, धनंजय चाळके यासह अनेकजण आले होते.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती घेत आहोत. या स्फोटातील मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी व जखमींना सरकार नक्कीच आर्थिक मदत करेल.वास्तविक पाहता शहराजवळ केमिकल कंपनी असू नये. आता या केलीकल कंपनी इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी सरकारने धोरणात्मक पाऊले उचलली आहे.मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत यावर अंमलबजावणी करता आली नाही. ४ जून नंतर यावर पाऊले उचलली जातील याची खात्री देतो या घटनेवर विरोधी पक्षाने उद्योग मंत्री सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याबद्दल विचारले असता म्हणाले, हि घटना गंभीर असून त्याचे विरोधी पक्षाने राजकारण करू नये.अशी घटना पुन्हा होणार नाही याकडे सरकार लक्ष देईल. कामा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ.देवेन सोनी म्हणाले,सोनी- कंपनीला आग लागल्याने आजबाजूच्या कंपनीही फटका बसला आहे.आग लागल्याचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेची चौकशी होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img