आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटची गरज भासते. बँकेची कामे सुद्धा सोपी झाली आहेत. एटीएम कार्डच्या मदतीने तुम्ही बँकेत न जाता कधीही पैसे काढू शकता. (Credit Card) पैसे नसतील तर ऑनलाइन पेमेंट चुटकीसरशी करू शकता आणि जर एखाद्या वेळी पैसेच नसतील तर क्रेडिट कार्डच्या मदतीने पेमेंट करू शकता. आज क्रेडिट कार्डचा वापर अगदी सामान्य झाला आहे. शॉपिंग करायची असेल मोबाईल किंवा लाईट बिल भरायचे असेल तर क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की या क्रेडिट कार्डचा वापर कधीपासून सुरू झाला. क्रेडिट कार्ड कशी अस्तित्वात आले. नाही ना चला तर मग आज आपण या क्रेडिट कार्डची सगळी कुंडली जाणून घेऊ या.. क्रेडिट कार्डचा सोप्या भाषेत अर्थ म्हणजे आधी खर्च करा नंतर पैसे द्या. तसं पाहिलं तर ही पद्धत खूप जुनी आहे. पण क्रेडिट कार्डची सुरुवात विसाव्या शतकाच्या मध्यातील मानली जाते. परंतु याचा पाया 1900 मधील सुरुवातीच्या काही वर्षांतच पडला होता. अमेरिकेसारख्या देशांत डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि तेल कंपन्यांनी आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केले होते. पण हे कार्ड आजच्या ट्रॅडिशनल कार्ड सारखे नव्हते. या कार्डचा उपयोग काही ठराविक स्टोअर्स वरच केला जाऊ शकत होता.
सन 1950 मधील गोष्ट आहे. अमेरिकेच्या प्रतिष्ठित डायनर्स क्लब इंटरनॅशनलचे संस्थापक फ्रँक मॅकनामारा जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंट मध्ये गेले. जेवण झाल्यानंतर पैसे देण्यासाठी खिशात हात टाकल्यावर लक्षात आले की पैशाचं पाकीट तर घरीच राहिलं. आता काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. याच वेळी त्यांच्या डोक्यात आयडिया आली की असे एक कार्ड असले पाहिजे ज्याचा उपयोग फक्त डिपार्टमेंटल स्टोअर्सच नाही तर अन्य ठिकाणी बिल पेड करण्यासाठी करता येऊ शकेल. याच उद्देशाने जगातील पहिले क्रेडिट कार्ड डायनर्स क्लब कार्ड अस्तित्वात आले. या कार्डचे 1951 मध्ये लॉन्चिंग करण्यात आले. सुरुवातीला या कार्डचा भर यात्रा आणि मनोरंजनाशी संबंधित खर्चांवर होता. परंतु हा प्रयोग इतका यशस्वी ठरला की यातूनच पुढे क्रेडिट कार्ड क्रांतीचा मार्ग मोकळा झाला.
२० किलो च्या गाऊन वर थिरकली नॅन्सी त्यागी.. कोण आहे ही नॅन्सी त्यागी?
Credit Card भारतात क्रेडिट कार्डची सुरुवात कधी झाली?
पश्चिमी देशांत यशस्वी झाल्यानंतर 1980 मध्ये क्रेडिट कार्डने भारतात एन्ट्री घेतली. स्टेट बँकेने 1988 मध्ये आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली. यानंतर देशातील अन्य बँका आणि वित्तीय संस्थांनी क्रेडिट कार्डच्या मॉडेलचा स्वीकार केला.
Credit Card भारतात किती लोकांकडे क्रेडिट कार्ड?
रिझर्व्ह बँकेकडून डेटानुसार भारतात सन 2023 अखेर 9 कोटींपेक्षा जास्त ॲक्टीव्ह क्रेडिट कार्ड होते. 2022 मध्ये ही संख्या 8 कोटींपेक्षा कमी होती. म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीत क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या 17 टक्क्यांनी वाढली. जानेवारी 2020 मध्ये फक्त 5.6 कोटी लोकांकडे क्रेडिट कार्ड होते. याचा अर्थ मागील तीन वर्षांच्या काळात क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांच्या संख्येत तब्बल 63 टक्के वाढ झाली.अमेरिकेसारख्या विकसित देशांचा विचार केला तर येथे 82 टक्के लोकांकडे कमीत कमी एक क्रेडिट कार्ड आहे. अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त कार्ड आहेत. यावरून अंदाज लावता येतो की अमेरिकी लोकांकडे सरासरी 3.84 क्रेडिट कार्ड आहेत.
Credit Card क्रेडिट कार्डच्या काही खास गोष्टी
1970 मध्ये मेगनेटिक स्ट्रिप टेक्नॉलॉजी विकसित झाली. यामुळे क्रेडिट कार्डच्या सुरक्षेत वाढ झाली आणि इलेक्ट्रिक ऑथोरायजेशनचा मार्ग मोकळा झाला. 1990 च्या दशकात क्रेडिट कार्डमध्ये मायक्रो चीपचा वापर होऊ लागला. यामुळे कार्ड क्लोन करणे किंवा डेटामध्ये हेराफेरी करणे आणखी कठीण झाले.सन 2000 च्या दशकात इंटरनेट आणि ई कॉमर्सचा आविष्कार झाला. यामुळे क्रेडिट कार्ड वापर करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. पुढे 2010 च्या दशकात काँटॅक्टलेस तंत्रज्ञानाचा अविष्कार झाला. यामुळे कार्डधारकांना फक्त त्यांच्या कार्डवर टॅप करून कमी वेळात आणि सुरक्षित पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध झाली.मागील काही वर्षांत डिजिटल वॉलेट आणि मोबाईल पेमेंट बरोबर क्रेडिट कार्डच्या ताळमेळाने नवा बदल असा झाला आहे की क्रेडिट कार्डच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. आता क्रेडिट कार्डला युपीआय बरोबर जोडल्यानंतर क्रेडिट कार्डच्या वापरात आणखी वाढ होईल असा अंदाज आहे. सध्या ही सुविधा फक्त रूपे क्रेडिट कार्डपर्यंत मर्यादित आहे.