7.8 C
New York

Ujani Dam : बोट उलटून उजनीत 6 जण बुडाले

Published:

सोलापूर : उजनी धरणात (Ujani Dam) एक मोठी दुर्घटना (Mishap) घडली आहे. प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्यानं सहा जण धरणात बुडाले. त्यात दोन बालकांचा समावेश आहे. ती दोन बालके आणि त्यांचे आई-वडील करमाळा तालुक्यातील झरे येथील होते. इतर दोघे करमाळ्याच्याच कुगावचे आहेत. उजनीत बुडालेल्या सहा जणांचा रात्रभर शोध घेण्यात येत होता. त्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची मदत घेण्यात आली. मात्र रात्री त्यांचे मृतदेह आढळून आले नाहीत. बुधवारीही शोधकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे या दुर्घटनाग्रस्त बोटीत एक पोलीस उपनिरीक्षकही होते. बोट उलटल्यानंतर ते मोठ्या धाडसाने पोहत काठावर पोहचले. त्यांचे नाव राहुल डोंगरे असून त्यांनीच गावकऱ्यांना तसेच आणि प्रशासनाला या दुर्घटनेची माहिती दिली.

Ujani Dam : वारा, पावसाने केला घात

दुर्घटनाग्रस्त बोट उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान वाहतूक करत असताना उलटली. सायंकाळच्या सुमारास अचानक वारा आणि पाऊस आल्याने बोट हेलकावे घेत धरणाच्या खोल पाण्यात उलटली आहे. बोट मध्ये कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. कुगाव ते कळाशी दरम्यान ही बोट नियमित प्रवासी वाहतूक करत दिवसातून 10 ते 12 फेऱ्या मारते.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोन हॉटेलना टाळे

Ujani Dam : रात्रभर शोधकार्य

उजनी धरणात बुडालेल्या या बोटीतून पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे सुदैवाने बचावले. त्यांच्यामुळेच ही दुर्घटना उघडकीस आली. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील प्रशासन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर बुडलेल्या लोकांचा उजनीत शोध घेण्यात आला. धरणात बुडलेल्यांची नावे गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकुळ जाधव (वय 25), शुभम गोकुळ जाधव (एक वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय 35) व गौरव डोंगरे (वय 16) अशी आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img