3.6 C
New York

Aishwarya Rai: ऐश्वर्याच्या दुखापतीचे खरे कारण आले समोर..

Published:

विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने (Aishwarya Rai) कान्स महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्याच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, ऐश्वर्याच्या हाताला असलेली दुखापत पाहून चाहत्यांच्या काळजाला धक्का बसला. कान्समधील (Cannes 2024) ऐश्वर्याचे फोटो आणि व्हिडीओ मीडियावर व्हायरल झाले. व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला. मात्र ऐश्वर्याच्या हाताला जखम कशी झाली असा अनेकांना प्रश्न पडला. सध्या ती कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण करत नाही. तरीदेखील तिच्या हाताला दुखापत कशी झाली, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात पडला होता. परंतु आता ऐश्वर्याच्या दुखापतीचे कारण समोर आले आहे.

ऐश्वर्याने स्लिंग घालून रॅम्प वॉक केला तेव्हा लोकांनी तिचे कौतुक केले. त्याचवेळी तिच्या हाताला काय झाले या विचाराने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. ‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, ऐश्वर्याच्या हाताला 11 मे रोजी दुखापत झाली होती. ती घरात पडल्याने तिचे मनगट फ्रॅक्चर झाले असल्याची माहिती आहे. तिच्या मनगटातील सूज कमी झाल्यानंतर तिने आपले काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता शस्त्रक्रिया होऊ शकते.

२० किलो च्या गाऊन वर थिरकली नॅन्सी त्यागी.. कोण आहे ही नॅन्सी त्यागी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याची डिझायनर सोबत कॉस्ट्यूम फिटिंग होती. त्याच्या दोन दिवस अगोदर तिचा हात फ्रॅक्चर झाला.
यावेळी तिने वेन्यू कम्फर्टेबल आणि मोठं असावे अशी विनंती केली. ज्यामुळे तिला कोणताही त्रास होणार नाही. तिला दुखापत झालेली असूनही ऐश्वर्याने वेळ दिल्याबद्दल ब्रँडने तिचे आभार मानले. डॉक्टरांनी सांगितले की, हातावरील सूज उतरल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करता येईल. सध्या ती फिजिओथेरपी घेत असून डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर तिने कान्स चित्रपट महोत्सवात उपस्थिती दर्शवली.

दरम्यान यंदाही ऐश्वर्याचा जलवा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024’मध्ये पाहायला मिळाला आहे. पहिल्या दिवशी ऐश्वर्या रायने काळ्या-पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर दुसऱ्या दिवशी निळा, हिरवा आणि सिल्वर रंगाचा टिनसेल गाऊन परिधान केला होता. तिचे धमाकेदार दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ऐश्वर्याने लाडकी लेक आराध्या बच्चनसोबत ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024’मध्ये हजेरी लावली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img