23.1 C
New York

ShivSena : गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करा ‘या’ नेत्याची मागणी

Published:

मुंबई

राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Elections) पाचही टप्पे पूर्ण झाले आहे. आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde) गटामध्ये पुन्हा वाद चव्हाट्यावर आले आहे. शिवसेनेचे (ShivSena) जेष्ठ नेते गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणीत म्हटले आहे की, ही कुठली आपसातली स्पर्धा नाही, किर्तीकरांना मी पदावरुन खाली खेचावं यासाठीची ही कृती नाही. तर पक्षात चांगलं वातावरण रहावं यासाठीची ही स्पर्धा आहे. आपल्या वक्तव्यानं आणि आपल्या कृतीनं पक्षाची कुठल्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, या भावनेनं मी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आहे असं शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.

हा विषय आजच संपूर्णपणे निकाली निघेल. पण जे चुकीचं आहे ते चुकीचचं आहे हे माझं शिवसैनिक म्हणून काम आहे. शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये त्यांच्या भावनांना मी वाट करुन दिली. मी जनतेचा लाऊडस्पीकर आहे. पिता-पुत्रामध्ये मिठाचा खडा पडावा किंवा घरामध्ये भांडणं व्हावीत यासाठी सुसंस्कृत राजकारणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणार नाही शेवटी मुलालाही काही व्यक्ती स्वातंत्र असेल ना? वडिलांच्या भावना असतात त्यातून गजाभाऊ बोलले असतील पण हे सर्व पक्षाच्या मुळावर येऊ नये हीच माझी इच्छा आहे असंही शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img