3.8 C
New York

Pune Accident : आरोपीच्या फायद्यासाठी पुणे पोलिसांचा तपासात घोळ – वडेट्टीवार

Published:

मुंबई

पुणे अपघात (Pune Accident) प्रकरणी आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआर (FIR) मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या यावरून पोलिसांच्या (Police) कृतीवर शंका उपस्थित होत असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवार यांनी घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी अशी मागणी करत पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी असे आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती?ही दिशाभूल का केली जात आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img