23.1 C
New York

Pune Accident : विशाल अग्रवालवर न्यायालयाबाहेर शाई फेकली

Published:

पुणे

महाराष्ट्रातील पुणे (Pune) येथे पोर्श कार अपघात (Pune Accident) प्रकरणाने देश हादरला. ज्या पद्धतीने ही घटना घडली आणि नंतर अवघ्या काही तासांतच अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला, त्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली. पुण्यात सत्र न्यायालयासमोर (Pune Sessions Courts) गोंधळ पाहायला मिळाला आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांना न्यायालयाकडे आणले जात असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. वंदे मातरम संघटनेने हे काम केलं आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाबाहेर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पण, पोलिसांनी (Police) संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखलं आहे.

न्यायालयाने याप्रकरणात तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती. आरोपींचे वय लक्षात येऊनही आरोपी बार मालकाने अल्पवयीन आरोपी, त्याच्या मित्रांना दारु विक्री केल्याचे म्हणणे सरकारी पक्षाने मांडले.

हिट अँड रनची ही घटना 19 मे रोजी घडली होती. कल्याणी नगरमध्ये हा अपघात घडला होता. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने हा अपघात केला होता. महागड्या पोर्श कारने दुचाकीवरील दोघांना चिरडले होते. दोन्ही अभियंते होते. प्रकरणात अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी पिझ्झा आणि बर्गर आणून दिले होते. कोर्टाने काही अटी-शर्तीवर त्याची 15 तासांच्या आत जामीनावर सूटका केली होती.

बाल न्याय मंडळाने आरोपीला 15 दिवसांपर्यंत ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करण्याचे आणि रस्ते अपघातावरील प्रभावी तोडगा काय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितले होते. पोलीस तपासात आरोपी हा मद्याच्या अंमलाखाली होता आणि भरधाव कार चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img