19.7 C
New York

Prashant Damle: दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी प्रशांत दामलेंचा उपोषणाचा इशारा…

Published:

महाराष्टच्या संस्कृतीचा एक भाग म्हणजे नाटक. ज्या नाटकासह तमाशा, लावणी आणि लोककलेची अभिजात परंपरा जपणारी रंगकर्मींची हक्काची जागा म्हणजे परळचं दामोदर नाट्यगृह (Damodar Natyagruha). गेल्या काही दिवसांपासून 101 वर्षांची परंपरा असणारं दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीमुळे चर्चेत आहे. परंतु या नाट्यगृहावर हातोडा पडला आहे. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून (Bhushan Gagarani) पाडकामाची पाहणी करण्यात आली. दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

१०१ वर्ष जून नाट्यगृह असून अनेक पिढ्या आणि दिग्गज कलाकारांचा स्पर्श झाला आहे. या नाट्यगृहाचा पुनर्विकास होत असून दामोदर नाट्यगृहाच्या पाड कामाला सुरुवात झाली आहे. मात्र दुसऱ्या जागेत दामोदर नाट्यगृहाच्या पुनर्विकासाला कलाकार मंडळींचा विरोध आहे. नाट्यगृहाच्या परिसरात असलेल्या सोशल सर्विस लीग शाळेचा पुनर्विकास केला जात आहे. परंतु अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळ आणि त्यासोबतच नाट्य क्षेत्रातील कलाकार मंडळींनी दामोदर नाट्यगृहाचा पुनर्विकास होत असताना तो त्याच ठिकाणी व्हावा आणि भव्य दिव्य असं दामोदर नाट्यगृह लवकरात लवकर उभे केले जावे, अशी मागणी केली आहे. आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगनणी यांनी सगळ्या कामाची पाहणी केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने काय केल्या आहेत मागण्या?
दामोदर नाट्यगृहाच्या जागी बांधण्यात येणाऱ्या शाळेचं आरक्षण रद्द व्हावं. तर नाट्यगृहाचा वाढीव FSI नाट्यगृहासाठीच वापरला जावा. शाळेचं बांधकाम आणि नाट्यगृहाच्या पुनर्विकास एकाचवेळी सुरू व्हावा. दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच त्यांना नव्या नाट्यगृहात काम मिळावं आणि तोवर त्यांना पर्यायी रोजगार द्यावा. पूर्वीप्रमाणेच नव्या दामोदर नाट्यगृहात सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय तसंच तालमीची जागा असावी. नवे नाट्यगृह निर्माण होईपर्यंत संस्थेस वापरण्यायोग्य पर्यायी जागा मिळावी. दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणास्तव बंद आहे. परंतु परंपरेची ओळख असलेल्या १०१ वर्षे जुन्या नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे.

विकी-कतरिनाच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल? व्हिडिओ आला समोर!

सहकारी मनोरंजन मंडळातर्फे नाट्यगृह आहे त्याच जागी तब्बल 900 आसन क्षमतेचे असावे अशी मागणी करण्यात आली आहे. याआधी नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीच्या कामाचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा अधिवेशनात करण्यात आली. परंतु,मे महिन्यापासून सोशल सर्व्हिस लीगने पुन्हा तोडकाम सुरू केले. त्यामुळे आता दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी अनेक अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img