7.3 C
New York

 Pm Narendra Modi : PM मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा

Published:

‘माझी आई गेल्यानंतर नी कन्व्हिन्स झालोय की परमात्म्यानेच मला पाठवलं आहे. ही ऊर्जा मला बायोलॉजिकली मिळालेली नाही. ही ऊर्जा ईश्वराने मला काही काम करण्यासाठी दिली आहे. सामर्थ्य दिलंय, प्रामाणिकपणाही दिला आहे आणि प्रेरणा सुद्धा तोच देत आहे. पुरुषार्थ करण्याचं सामर्थ्यही देत आहे. मी कुणीच नाही फक्त एक माध्यम आहे. ईश्वराने माझ्याकडून काहीतरी करून घेण्याचं ठरवलं आहे. म्हणूनच मी ज्यावेळी काही करतो त्यावेळी माझ्या मनात अशी धारणा असते की ईश्वरच माझ्याकडून हे करवून घेत आहे’, हे शब्द आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Pm Narendra Modi)  यांचे.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केलेल्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा होत आहे. देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. पाच टप्प्यांतील मतदान झालं आहे. आणखी दोन टप्पे राहिले आहेत. या निवडणुकीत मोदींनी तुफान प्रचार केला. रोड शो, प्रचार सभांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचार केला. विविध प्रसारमाध्यमांना मुलाखतीही दिल्या. आताही त्यांनी एका मुलाखतीत असं वक्तव्य केलंय ज्याची राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.

पुणे अपघात प्रकरणी फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावलं

या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही थकत का नाहीत. मागील पाच वर्षांच्या तुलनेत तुम्ही आता जास्त ऊर्जावान दिसत आहात. तुम्ही थकत का नाहीत. या प्रश्नावर उत्तर देताना मोदी म्हणाले, आता मी कन्व्हिन्स झालोय की मला नक्कीच परमात्म्यानं इथं पाठवलंय. हे ऐकून लोक माझ्यावर टीका करतील. पण ही ऊर्जा बायोलॉजिकल शरीराकडून मिळत नाही. ही ऊर्जा ईश्वराने मला दिली आहे. कदाचित त्याला माझ्याकडून काही काम करवून घ्यायचं असेल.

मोदी पुढे म्हणाले, मी काहीच नाही. मी फक्त एक माध्यम (इन्स्ट्रुमेंट) आहे. जे ईश्वराने माझ्या रुपात घेण्याचं ठरवलं आहे. म्हणूनच मी ज्यावेळी काही करतो त्यावेळी माझ्या मनात विचार असतो की ईश्वरच माझ्याकडून हे काम करवून घेत आहे. त्यामुळे मी नावलौकिक किंवा बदनामीची कधीच चिंता करत नाही. मी पूर्णपणे ईश्वराला समर्पित आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img