भारतीय सिनेसृष्टीतील आतापर्यंतचा ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट म्हणून ‘बाहुबली’ला ओळखलं जातं. या चित्रपटात कट्टप्पा या व्यक्तीरेखेने आपली छाप सोडली. अभिनेता सत्यराज (Sathyaraj) यांनी साकारलेली कटप्पा ही भूमिका प्रभासच्या बाहुबली इतकीच प्रेक्षकांच्या पसंतीस आली. बाहुबलीच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. सध्या कट्टप्पा म्हणून ओळखले जाणारे त्यराज यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सत्यराज हे पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये (PM Modi Biopic) त्यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारीत एका चित्रपटाच्या निर्मितीची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता सत्यराज हे पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, एका तामिळ वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सत्यराज यांनी पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार का, यावर मोठा खुलासा केला होता.
’रामायण’ चित्रपटाचे किती भाग होणार प्रदर्शित? दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा…
एका मुलाखतीत सत्यराज यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या बातम्यांनी मीच हैराण झालो आहे. पंतप्रधान मोदींच्या बायोपिकमध्ये मी काम करत असल्याची बातमी माझ्यासाठीही बातमी आहे. पीएम मोदींची भूमिका साकारण्यासाठी कोणीही माझ्याशी संपर्क साधला नसून लोक सोशल मीडियावर कोणत्याही बातम्या पसरवत असतात, असेही त्यांनी म्हटले. या अफवांसाठी सत्यराज यांनी सोशल मीडियाला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले की, याआधी अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये यायच्या. आता सोशल मीडियावर कोणत्याही तथ्य नसलेल्या अफवा बातम्या म्हणून पसरत आहे. सोशल मीडिया हे अफवा पसरवण्याचे ठिकाण झाले असल्याचे त्यांनी म्हटले.
सत्यराज हे पेरियारवादी असून पेरियारविरोधी विचारसरणी असलेल्या कोणत्याही चित्रपटात ते काम करणार नाहीत असा दावा त्यांनी अनेकदा केला आहे. राजकीयदृष्ट्या पेरियावादाची विचारधारा विरोधी आहे . तसेच पंतप्रधान मोदींचा पक्ष भाजप पूर्णपणे विरुद्ध ध्रुवांवर असल्याचे दिसून येते. त्यामुळेच सत्यराज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारण्यास तयार कसे झाले, याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. सत्यराज यांचा ‘वेपन’ 23 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.