21 C
New York

Paytm : पेटीएमच्या महसुलात 25 टक्के नोंदवली वाढ

Published:

भारतीय युपीआयसह सेवा बाजारातील जु्ना खेळाडू पेटीएमने (Paytm) चमकदार कामगिरी दाखवली. कंपनीने महसूलात मोठी घौडदौड केली. या फिनटेक कंपनीने आता विमा क्षेत्रासह इतर विभागावर लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जोरदार कामगिरी बजावली. कंपनीच्या महसूलात 25 टक्क्यांची घसघशीत वाढ झाली. कंपनीचा महसूल आता 9,978 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीची संपूर्ण वर्षाचा EBITDA पहिल्यांदाचा 559 कोटींच्या घरात पोहचला आहे. आयपीओ बाजारात दाखल झाल्यापासूनचा हा आलेख आहे.

Paytm आता या क्षेत्रावर फोकस

या आर्थिक वर्षात (FY 25) कंपनी विमा, वित्तीय सेवा आणि उत्पादनांवर भर देणार आहे. त्यासाठी वितरणाचे मजबूत जाळे विणण्यावर भर देण्यात येणार आहे. Paytm ने एआयच्या वापरावर भर दिला आहे. कंपनीने मल्टी-बँक मॉडेलवर काम सुरु केले आहे. त्याआधारे दीर्घकालीन कमाईच्या संधी शोधण्यात येणार आहे. त्यावर काम करण्या येणार आहे. One97 Communication limited चा पेटीएम हा ब्रँड आहे. भारताच्या आर्थिक क्षेत्रातील ही मोठी कंपनी आहे. ही QR कोड, साऊंडबॉक्स आणि मोबाईल पेमेंटमधील सर्वात आघाडीची कंपनी आहे.

या आर्थिक वर्षात (FY24) कंपनीने या क्षेत्रात कमाल कामगिरी करुन दाखवली. कंपनीने भरीव वाढ दर्शविली. कंपनीने कोट्यवधी पेमेंट आणि वित्तीय सेवांमध्ये भरीव कामगिरी बजावली. कंपनीच्या महसूलात 25 टक्के वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर या वाढीमुळे महसूलाचा आकडा आता 9,978 कोटींच्या घरात पोहचला आहे.

PM मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची सर्वत्र चर्चा

कंपनीचे नफ्यातील योगदानात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 42 टक्के नफा झाला, हा आकडा 5,538 कोटी रुपयांवर पोहचला. वित्तीय सेवांच्या माध्यमांतून हा आकडा गाठता आला. कंपनीचा पेमेंट सेवेचा महसूल 26 टक्क्यांनी वाढला. तो वार्षिक आधारावर या आर्थिक वर्षात 6,235 कोटींच्या घरात पोहचला. तर या चौथ्या तिमाहीत त्यात 7 टक्के वार्षिक आधारावर वाढ होऊन हा आकडा 1,568 कोटींच्या घरात पोहचला. तर कर्ज वितरण मूल्य 48 टक्क्यांच्या घरात पोहचले. या आर्थिक वर्षात कर्ज वितरणाचा आकडा 52,390 कोटींच्या घरात पोहचले आहे.कंपनीचे एकूण व्यापारी मूल्य (Gross merchandise Value) 39 टक्क्यांनी वाढले आहे. या आर्थिक वर्षात हा आकडा 18.3 लाख कोटींच्या घरात पोहचला.

Paytm क्रेडिट वितरणावर दिला भर

या आर्थिक वर्षात पेटीएमने केवळ क्रेडिट वितरणावर अधिक भर दिला. वितरणातही त्यांचे लक्ष क्रेडिट वितरण मॉडेलवर होते. बँका, वित्तीय संस्था आणि तंत्रज्ञानाची मदत यांच्या सहाय्याने कंपनीने मोठी भरारी घेतली. त्याआधारे कंपनीने कर्ज वितरणावर लक्ष केंद्रीत केले.

Paytm पेटीएम आता TDAP

पेटीएम आता विस्तारली आहे. युपीआय चॅनल आणि एनपीसीआयच्या मदतीने कंपनीची घौडदौड सुरु आहे. कंपनी ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँकेच्या मदतीने युपीआय युझर्सला सहज आणि सोप्यारित्या युपीआय पेमेंट सेवा देत आहे.

ॲक्सिस बँकेकडे नोडल खाते आहे. तर एसक्रो खाते ही सुरळीतपण सुरु आहे. नवीन युपीआय व्यवहारासाठी येस बँकेची मदत होत आहे. इतर सेवा-सुविधा जशा की नोडल, एसक्रो, बीआयचे कार्यपण सुरळीत सुरु आहे. हे सर्व सेवांचे स्थलांतरण अगदी सहज झाले आहे.पेटीएमकडे रोखीत व्यवहारासाठी मार्च 2024 अखेर 8,650 कोटी रुपये शिल्लक होती. आर्थिक आरोग्यासाठी ही ठेव उपयोगी ठरली आहरे. यामध्ये पेटीएम मनीचा ग्राहक निधी डिसेंबर 2023 मध्ये 462 कोटी तर मार्च 2024 मध्ये 339 कोटी रुपये इतका होता. त्यात अजून 375 कोटींच्या रोखीची भर पडली आहे, जी की युपीआय इन्सेटिव्ही व्यतिरिक्त आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img