3.8 C
New York

Mohena Kumari: ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूस! पाच वर्ष अभिनयक्षेत्रापासून दूर…

Published:

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री व डान्सर मोहेना कुमारीने (Mohena Kumari) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये कार्तिकच्या बहिणीची भूमिका साकारून ती लोकप्रिय झाली. नुकतंच एक व्हिडिओ शेअर करत मोहेनाने चाहत्यांना गुड न्यूज दिली. तिने आपल्या करिअरची सुरुवात रिअॅलिटी शोपासून केली आणि त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. मोहेनाने एप्रिल महिन्यात मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता पहिल्यांदाच तिने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली.

ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. मोहेनाने पती, मुलगा, ती व तिची लाडकी लेक असा सर्वांचा एक छान व्हिडीओ शेअर केला आहे. तिने कॅप्शन लिहिले की, “आधी दोन ते तीन, आता तीन ते चार. अयांशला आता एक लहान बहीण आहे. आम्ही आमच्या आयुष्यात लहानग्या गौरिताचं स्वागत करत आहोत,” असं कॅप्शन देत मोहेनाने व्हिडीओ पोस्ट केला आहे.

’रामायण’ चित्रपटाचे किती भाग होणार प्रदर्शित? दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा…

मोहेनाने लेकीचं नाव गौरिता ठेवलं आहे. या व्हिडीओत मोहेना, तिचा पती सुयश, त्यांचा लेक अयांश व चिमुकली गौरिता या सर्वांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवले, यात सर्वात शेवटी तिची लेक गौरिताचा दिसत आहे. तिने पती सुयश रावतला टॅग करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते खुश झाले आहेत. लेकीच्या जन्मनंतर आता तिने पहिली पोस्ट करून लाडक्या लेकीचं स्वागत केलं व तिचं नाव जाहीर केलं.

दरम्यान, मोहेनाने ‘दिल दोस्ती डान्स’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण लग्नानंतर ती संसारात रमली व अभिनयक्षेत्रापासून दूर झाली. सध्या ती तिच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img