मुंबई
गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यावर पक्षांतर्गत (Loksabha) कारवाई होणार असल्याची मोठी बातमी सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना नेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवून गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. अशातच आता भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार. अशा पद्धतीने आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचं, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांचा मान राखला. ते वरिष्ठ नेते आहेत. त्या दृष्टीने त्यांना वागणूक दिली. पण कीर्तिकरांचा उद्देशच संशयास्पद असल्याचे आता दिसून येत असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले.
दरेकर म्हणाले कि, अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नाही. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. गृहमंत्री असूनही जनतेच्या हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी केली. ज्या ३०४ अ कलमासंदर्भात विरोधक टीका करताहेत ते ३०४ कलम असल्याचा दावाही गृहमंत्री फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः वकील असल्याने पोलिसांइतकेच त्यांनाही कायद्याचे ज्ञान आहे. राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत. ते नवखे नाहीत. पोलीस त्यांना चुकीची माहिती देऊ शकत नाहीत. त्यांना कलमं माहित आहेत. ज्या पबमध्ये आरोपी गेला होता त्या पबवरही कारवाई झालेली आहे. त्यामुळे विरोधक या प्रसंगाचे फक्त राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत असल्याचे दरेकर म्हणाले.
दरेकर म्हणाले कि, रविंद्र धंगेकर एकदा आमदारकीत विजय मिळाल्यामुळे समजात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करून आपले नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना जनता फसणार नाही. कारण सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या विषयात गंभीर आहेत. कारवाई करताहेत. धनगकरांना केवळ या विषयाचे राजकारण करायचे आहे. धंगेकर पराभूत होणार असल्याचे माहित असल्याने त्यांची नौटंकी सुरू आहे. निलेश लंकेही त्याच धाटणीतील आहेत. त्यांचाही पराभव होणार आहे. बाळूमामा म्हात्रेही भिवंडीतून हरणार आहेत. तसेच अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचाही दरेकरांनी चांगलाच समाचार घेतला. जे गृहमंत्री म्हणून तुरुंगात जाऊन आले, ज्यांनी शंभर कोटीचे वाझेला टार्गेट दिले होते, ज्यांनी बदल्यांमध्ये हैदोस घातला होता त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का? अनिल देशमुख यांनी नाकाने कांदे सोलू नये, असा टोला दरेकरांनी लगावला.
दरेकर म्हणाले, मुंबईत सहाच्या सहा जागा भाजपा आणि शिवसेना जिंकेल. राज्यात ४५ पार करण्याच्या जवळपास आम्ही पोहोचू. परंतु ४० च्या वर भाजपा व महायुती शंभर टक्के जागा जिंकू ४० च्या खाली एकही जागा नसेल असा विश्वासही यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.
दरेकर म्हणाले कि, निवडणुका, मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानत असू तर त्या उत्सवाकरिता आवश्यक अशी यंत्रणा सुसज्ज करणे हे निवडणूक यंत्रणेचे कामं आहे. त्यात पूर्णपणे निवडणूक विभाग अपयशी ठरलेला आहे. या दुरावस्थेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मी सत्ताधारी पक्षाचा असून भुमिका घेतलेली. मी प्रत्येक मतदान केंद्रावर फिरलो. कोंबड्याचा खुराडा असतो तशा प्रकारची व्यवस्था होती. घुसमटून लोकं मेली नाहीत हे आपले नशीब आहे. मतदान केंद्रे वातानुकुलीत असावी, वेटिंगच्या जागाही वातानुकुलीत असाव्यात, एका मतदान केंद्रावर कमीत कमी ५०० मतदार घ्यावेत जेणेकरून गर्दी होणार नाही, अशा प्रकारच्या नियोजनाची भविष्यात गरज आहे. येणाऱ्या अधिवेशनात या सर्व अव्यवस्थेचा पर्दाफाश मी करणार आहे.
शिशिर शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केलेल्या मागणी की?
ही कुठली आपसातली स्पर्धा नाही, किर्तीकरांना मी पदावरुन खाली खेचावं यासाठीची ही कृती नाही. तर पक्षात चांगलं वातावरण रहावं यासाठीची ही स्पर्धा आहे. आपल्या वक्तव्यानं आणि आपल्या कृतीनं पक्षाची कुठल्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, या भावनेनं मी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आहे असं शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.
हा विषय आजच संपूर्णपणे निकाली निघेल. पण जे चुकीचं आहे ते चुकीचचं आहे हे माझं शिवसैनिक म्हणून काम आहे. शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये त्यांच्या भावनांना मी वाट करुन दिली. मी जनतेचा लाऊडस्पीकर आहे. पिता-पुत्रामध्ये मिठाचा खडा पडावा किंवा घरामध्ये भांडणं व्हावीत यासाठी सुसंस्कृत राजकारणी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणार नाही शेवटी मुलालाही काही व्यक्ती स्वातंत्र असेल ना? वडिलांच्या भावना असतात त्यातून गजाभाऊ बोलले असतील पण हे सर्व पक्षाच्या मुळावर येऊ नये हीच माझी इच्छा आहे असंही शिशिर शिंदे यांनी म्हटलं आहे.