21 C
New York

Loksabha : निवडणूक आयोगाच्या गलथानपणाचा मतदारांना फटका – आव्हाड

Published:

मुंबई

महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) मतदार यादी मधून अनेकांचे नाव गहाळ झाली होती तर निवडणूक आयोगाच्या (Election Commission) गलथानकारभारामुळे अनेक मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. निवडणूक (Loksabha) विभागाकडून करण्यात आलेल्या चुकीमुळे मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात इतकं कमी मतदान करताना लोकांच्या काय झालंय ते लक्षातच आलेलं नाही. मतदान केंद्रांवर पाणी नव्हतं, पंखे नव्हते, काही ठिकाणी मशीन बंद पडल्या. मतदारांची गैरसोय कशी होईल हे पाहिलं गेलं. मी कळवा मुंब्रा येथील आमदार म्हणून मी खुली तक्रार करतो आहे की हे निवडणूक आयोगाचं सपशेल अपयश आहे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या गलथानकारभारामुळेच हे सगळं झालं आहे. लोकांना मतदान करायचं होतं मात्र कुठे नावंच नाही, कुठे मतदान केंद्रच दूर अशा घटना घडल्या आहे. 1500 लोकांची एक यादी अशा याद्या तयार करण्यात आल्या आहेत. 500 ते 750 लोकांपेक्षा जास्त मतदारांची यादी नसावी. जेणेकरुन ते एका मशीनवर मतदान करु शकतात. यावेळेस निवडणूक आयोगाने काय केलं आहे माहीत नाही? समजा 1500 पैकी साठ टक्के लोक मतदानाला उतरले तर 900 लोक झाले. 1500 लोकांसाठी एक मशीन आधी दोन मशीन दिल्या जात होत्या. यावेळी सगळीकडे एकच मशीन. त्यामुळे मतदान पूर्णच झालं नाही. मतदान करायला लोकांना चार-चार तास लागत होते ही वस्तुस्थिती आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img