बॉलिवूडची ‘कॅट’ अर्थात कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या चर्चेत आली आहे. २०२१ मध्ये कतरिना अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्नबंधनात अडकली होती. ते दोघेही सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असतात. फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देतात. त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. त्यामुळे आता कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. कतरिनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या फोटोमध्ये तिने एका हातात कॉफीचा मग आणि दुसरा हात पोटावर ठेवल्याचे दिसून आले.
या फोटोमुळे कतरिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या. नेटकऱ्यांनी देखील अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरवात केली. विकी कौशल प्रेग्नंट कतरिना कैफला भेटायला लंडनला रवाना झाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर कतरिना प्रेग्नंट असल्याच्या अफवा अनेकदा समोर आल्या आहेत. जो पर्यंत विकी-कतरिना अधिकृत घोषणा करत नाही तो पर्यंत चाहत्यांनी यावर विश्वास ठेवू नये.
यामी गौतम-आदित्य धर यांना पुत्ररत्न! म्हणाले…
मात्र कतरिना आणि विकी सध्या लंडनमध्ये असून त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये ती गरोदर असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला. कतरिना कैफ काही वैयक्तिक कामानिमित्त लंडनमध्ये असल्याची माहिती आहे. आपल्या कुटुंबियांसोबत ती वेळ घालवत आहे. विकी देखील तिच्यासोबत सहभागी झाला आहे.
दरम्यान, कतरिना ‘मेरी क्रिसमस’ या चित्रपटात शेवटची झळकली होती. अद्याप तिच्या पुढील प्रोजेक्ट्स विषयी घोषणा केली नाही. मैने प्यार क्यू किया, नमस्ते लंडन, मेरे ब्रदर की दुल्हनिया, अजब प्रेम की गजब कहानी, राजनिती यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात झळकली होती. दीपिका आणि रणवीर सप्टेंबरमध्ये आई-बाबा होणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आई होणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप अभिनेत्री यासंदर्भात काहीही अधिकृत घोषणा केलेली नाही.