3.2 C
New York

Dombivli : डोंबिवलीत महिला लघुउद्योजकांचा सत्कार

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

महिलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी कर्जच्या माध्यमातून अर्थ सहाय्य करणाऱ्या कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्था (मर्या.) आणि उद्यम वुमेन एम्पॉवरमेंट फाऊंडेशन डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 25 मे रोजी डोंबिवलीत (Dombivli) लघु उद्योजक महामेळावा ब्राम्हण सभा येथे आयोजित करण्यात आहे. याची माहिती देण्यासाठी बुधवार 22 तारखेला डोंबिवलीत पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

पत्रकार परिषदेत अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर,सचिव सुनील जोशी, कोषाध्यक्ष रजनी अत्रे, उद्यमचे विशाल चौरे यांच्यासह इतर संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माहिती देताना डॉ. कोल्हटकर म्हणाले, ब्राह्मणसभा, टिळक रोड, डोंबिवली (पूर्व) येथे शनिवारी २५ मे रोजी होणाऱ्या लघु उद्योजक महामेळव्यात सुमारे १५० महिला उद्योजिका उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून तन्वी हर्बल संस्थापिका संचालक डॉ. मेधा मेहंदळे आणि कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्थेचे डॉ. उल्हास कोल्हटकर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात विशेष कर्तृत्ववान लघुउद्योजिकांचा सत्कार होणार असून उद्योजक विषयी मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे अशी माहिती देण्यात आली. ब्राम्हण सभेच्या सौजन्याने कौटिल्य नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापन २४ वर्षांपूर्वी झाली असून पतसंस्थेचे सध्या ३५२६ सभासद आहेत. पतसंस्था उद्यम वुमेन एम्पॉवरमेंट फाऊंडेशन डोंबिवली यांच्या मार्फत एकूण ११५६ महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी वित्त सहाय्य केले आहे. महिलांनी उद्योजक व्हावे हा उद्देश संस्थेचा असून संस्था विविध उपक्रम करीत असते त्याचाच भाग म्हणून डोंबिवलीत लघु उद्योजक महामेळवा आयोजित केला आहें.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img