शहरातील कल्याणी नगर परिसरात (Kalyani Nagar Car Accident) पोर्शे कारने दिलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालसह चौघांना अटक करण्यात आली असून, अग्रवाल आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाला आज (दि.22) कोर्टात हजर केले जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी मोठी घडामोड समोर आली आहे. अपघातात दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाल हक्क न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून, जर संबंधित मुलगा हजर न राहिल्यास त्याला पोलिसांकडून फरार घोषित करत त्याच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले जाऊ शकते. (Kalyani Nagar Car Accident Pune Police Issue Notice To Vishal Agrawal Son)
कल्याणी नगर परिसर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला बाल हक्क न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. त्यावेळी तो 17 वर्ष 8 महिन्यांचा असल्याचे सांगत त्याला जामीन देण्यात आला होता. परंतु, त्यानंतर पुणे पोलिसांकडून घडलेल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत संबधित मुलाला प्रौढ म्हणून ग्राह्य धरावे अशी मागणी करण्यात आली होती. पण, ही मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर आज या मागणीवर पुन्हा फेरविचार केला जाणार आहे. तत्पूर्वी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला बाल हक्क न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. जर संबंधित मुलगा न्यायालयात हजर न राहिल्यास त्याला फरार घोषित केला जाईल असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
मिथून चक्रवर्तींच्या रोड शोत दगडफेक
Kalyani Nagar Car Accident तर अल्पवयीन मुलाला तात्काळ अटक होणार
बाल हक्क न्यायालयाने जर अपघातातील अल्पवयीन आरोपीवर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची मान्यता दिली तर, संबंधित मुलाला पुणे पोलिसांकडून तात्काळ अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Kalyani Nagar Car Accident जामीनाचा निर्णय धक्कादायक; फडणवीस ‘अॅक्शन’ मोडमध्ये
कल्याणी नगर परिसरात झालेल्या भीषण अपघात प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (दि.21) पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक घेत सुरू असलेल्या करावाईचा आढावा घेतला. यावेळी दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा कोर्टाचा निर्णय पोलिसांसाठीही धक्का होता असे सांगितले. या घटनेत पोलिसांनी 304 कलम लावले असून, बाल न्याय मंडळाची भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. बाल न्याय मंडळाने केलेली कारवाई आमच्यासाठी धक्कादायक असून, आम्ही सुधारित आदेशाची अपेक्षा करत आहोत. तसे न झाल्यास पोलील उच्च न्यायालयात दाद मागतील असेही फडवीसांनी सांगितले.
Kalyani Nagar Car Accident दारू पुरवणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी
कल्याणी नगर भागात (Kalyani Nagar Car Accident) घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अल्पवयीन मुलांना दारू सर्व्ह केल्याप्रकरणी कोझी अन् ब्लॅक पब सील केले आहेत. तसेच कोझी आणि ब्लॅक या पबच्या व्यवस्थापकाला ( Pub Managers) विशेष न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.