21 C
New York

Election Commission : ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याचे चौकशीचे आयोगाचे आदेश

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात आणि राज्याच्या अंतिम टप्प्यात झालेले मतदान संथगतीने होत आहे. यावरून निवडणूक आयोगावर (Election Commission) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) यांनी मतदान सुरू असताना पत्रकार परिषदेमधून आरोप केला होता. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दाखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commissio) राज्य निवडणूक आयोगाला चौकशीचे आदेश दिले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग या संदर्भात उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे. यात काही वादग्रस्त आढळल्यास निवडणूक आयोग यावर कारवाई करणार आहे. 

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान पार पडलं. पण त्या दिवशी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ व्यवस्थापनेमुळे मतदारांना चार-चार तास रांगेत राहावं लागलं. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान न करताच घरी परतल्याचं दिसून आलं. 

यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच हे भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img