3.8 C
New York

Pen : वडखळच्या अंतर्गत रस्त्याची दुरावस्था

Published:

पेण

पेण (Pen) तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे कोकणातून येणारे काही पर्यटक मुंबई- गोवा महामार्गावरूनच थेट जात असल्याने येथील हॉटेल व्यावसायिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

एकतर कोकणातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या आणि मुंबई- गोवा महामार्ग येथून जाणारा पेण मधील वडखळ हे गाव येथे पुर्वी पासुन मुख्य बाजारपेठ या बाजारपेठत सफेद कांदे, पापड, लोणचे, निरगुडं, पोहे तसेच सुकी मच्छी यासह दर शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार तसेच मोठमोठ्या गाड्यांचे असणारे वर्कशॉप अशा अनेक वस्तू वडखळच्या मुख्य बाजारपेठेत मिळत असताना मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्ग गावाच्या बाहेरील बाजूस (बायपास) करत वळविण्यात आल्याने या बाजारपेठेची ओळख जवळपास पुसत चालली आहे. मात्र तरीही मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासी वर्गाला वडखळ बाजारपेठ हवेहवीशी वाटत आहे. परंतू गेल्या काही वर्षापासून वडखळ मधील अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्याची भयानक दुरावस्था झाली आहे.या भागातून प्रवास करणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक प्रवासी जीव मुठीत घेऊन जात आहेत. सदर रस्त्यावरती कोणत्याही क्षणी अपघात घडण्याची शक्यता असल्याने वडखळ हद्दीतील अंतर्गत रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोकणात येणारा पर्यटक हा वडखळ बाजारपेठेत वस्तू खरेदी करण्यासाठी थांबत होता.मात्र रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्याची झालेली दुरावस्था पाहता प्रवासी, वाहन धारक येथे न थांबता डायरेक्ट मुंबई- गोवा महामार्गावरू बाहेरूनच प्रवास करत आहेत.एकतर महामार्ग वडखळ गावाच्या बाहेरून गेला असल्याने येथील व्यापारी, हॉटेल व इतर वर्गाची फार मोठी हानी झाली आहे.त्यामुळे संबंधित बांधकाम प्रशासनाने सदरील वडखळ अंतर्गत रस्ता तातडीने दुरुस्त करावा.
योगेश म्हात्रे – वडखळ ग्रामस्थ

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img