8.7 C
New York

Sharmin Segal: शर्मीनच्या ट्रोलिंगबाबत ‘या’ अभिनेत्याने केले भाष्य…

Published:

‘हिरामंडी’ (Heeramandi) फेम अभिनेत्री शर्मीन सेगल (Sharmin Segal) चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या ‘हिरामंडी’ मधील अभिनयामुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ही वेबसीरीज नेटफ्लिक्सवर रिलीझ झाली आहे. शर्मीन सेगल भन्साळी यांची भाची असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे. अनेक सहकलाकार तिच्या समर्थनात बोलले असताना, परंतु अभिनेता जेसन शाहने (Jason Shah) तिच्या अभिनयाला ‘वन टोन’ म्हटले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जेसनने सांगितले की शर्मीनच्या पात्राला एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर जागा होती. “मला वाटले, वैयक्तिकरित्या, वेगवेगळ्या ठिकाणी ती चांगला अभिनय करू शकत होती. तिला तिचा अभिनय एक-टोन ठेवण्यास सांगितले असावे. बऱ्याच गोष्टी करण्यासाठी तिला जागा होती पण मी दिग्दर्शक नाही.” हीरामंडीच्या शूटिंगदरम्यान संजय लीला भन्साळी यांनी शर्मीनला दिले होते. भन्साळी यांनी शर्मीनला तिच्या डोक्यातून अभिनय करणे थांबवण्यास सांगितले होते आणि त्याऐवजी तिच्या मनापासून अभिनय करण्यास सांगितले होते.

हिरामंडी वेबसीरिजमधील शेखर सुमनने केलं ‘त्या’ सीनबाबत भाष्य…

तो पुढे म्हणाला की कदाचित निर्मात्यांनी तिला एकच स्वर आणि अभिव्यक्ती ठेवण्यास सांगितले आणि ती फक्त ऑर्डरचे पालन करत होती. तर शर्मीनला ट्रोल करण्याबाबत ऋचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, शेखर सुमन आणि इतरांनी शर्मीनची बाजू घेतली. शेखर सुमन म्हणाले तिच्या भूमिकेतप्रमाणे तिने बरोबर अभिनय केला. शर्मीनने ट्रोलिंगबाबत म्हंटले की, हीरामंडीमध्ये कास्ट होण्यापूर्वी तिला अनेक ऑडिशन्स द्याव्या लागल्या आणि भन्साळीची भाची असूनही तिला सेटवर सर्वांसारखेच वागवले गेले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img