21 C
New York

Pune Accident : अपघाताची न्यायिक चौकशी करा – वडेट्टीवार

Published:

मुंबई

पुण्यात झालेल्या भीषण अपघातात (Pune Accident) पुणे पोलिसांच्या (Pune Police) तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन चौकशी (Judicial Inquiry) व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारू पित असल्याचे सीसीटिव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली?रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली?नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही?या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करत सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img