7.3 C
New York

Shekhar Suman: शेखर सुमनच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे खळबळ…

Published:

‘हीरामंडी’ फेम अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शेखर सुमनने बीजेपीमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याआधी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिकीट मिळालं होतं. शेखर सुमनने भाजपचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हाने त्यांना हरवलं. त्यानंतर तीन वर्षांनी शेखर काँग्रेसमधून बाहेर पडला. तर लोकसभा निवडणुकीदरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला त्याने भाजपात प्रवेश केला. त्याने पूर्णपणे अभिनयक्षेत्र सोडून राजकीय प्रवास सुरू करण्याचा अभिनेत्याचा काही विचार नव्हता. अशातच आता शेखरच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

एका मुलाखतीत शेखर सुमन म्हणाला,”आजही एक उत्तम अभिनेता होण्याची माझी इच्छा आहे. हा राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत राहुनही मला राज्यासाठी काम करता येईल. परंतु राजकारणातील चढ-उतारांमध्ये मला अडकायचं नाही. माझी राजनैतिक महत्त्वकांक्षाही नाही त्यामुळे मी कोणी राजकारणी नाही. मला राजकारणात येऊन काही गोष्टी करायच्या आहेत.”

बॉलीवूडमधील ‘हे’ कलाकार बजावत नाही मतदानाचा हक्क! कारण…

शेखर सुमनने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचं कौतुक
शेखर सुमनने प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं आहे. अभिनेता म्हणाला,”एका व्यक्तीने देशात विकास होत आहे. अनेक गोष्टी नीट केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीय परदेशात जातो तेव्हा त्याला भारतीय असण्याचा अभिमान वाटतो. या सगळ्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत”. शेखरचा मुंबईत आलिशान बंगला आहे. त्याची एकूण संपत्ती 20 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img