21 C
New York

Ramayan:’रामायण’ चित्रपटाचे किती भाग होणार प्रदर्शित? दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा…

Published:

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या शूटिंगला गेल्या काही दिवसांपासून सुरवात झाली आहे. बऱ्याचदा सोशल मीडियावर शूटिंग दरम्यानचे फोटो व्हायरल झाले आहेत. चित्रपटाच्या रणवीर आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा लूक, सेटवरील अनेक फोटो असे फोटो लिक झाले होते. त्यामुळे चाहत्यांना चित्रपटाबद्दल फार उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट तीन भागांत रिलीज होणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु, निर्मात्यांनी हा बहुचर्चित चित्रपट दोन भागांत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगला ३५० दिवस लागणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार. चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं असून रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सनी देओल मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अगोदर या चित्रपटाचे तीन भागात विभागीकरण केले होते. मात्र आता दोनचं भागात चित्रपट विभागला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ११ करोडहुन अधिक रक्क्म चित्रपटाच्या सेटसाठी वापरण्यात आली आहे. लवकरच पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला सुरवात होणार आहे.

शेखर सुमनच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे खळबळ…

बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्री रामांची भूमिका साकारणार आहे तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीरचा विशेष लुक असणार आहे त्यामुळे सध्या या लूकसाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि सई पल्लवी व्यतिरिक्त सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत, केजीएफ स्टार यश रावणाच्या भूमिकेत, लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत तर बॉबी देओल कुंभकरणच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रणबीर कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर, रणबीर शेवटचा ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसला होता. रणबीर ‘रामायण’ चित्रपटाव्यतिरिक्त दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातही दिसणार आहे. पुन्हा रणबीर आणि आलिया एकत्र झळकणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या सिक्वेलचाही भाग असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img