21 C
New York

Raju Waghmare : राजू वाघमारेंची संजय राऊतांवर टीका

Published:

मुंबई

निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर कोपऱ्यात रडत बसण्याची पाळी विरोधकांवर येणार आहे. रडू बाई रडू आणि कोपऱ्यात बसू अशी त्यांची अवस्था होणार आहे. याची विरोधकांना सुद्धा खात्री आहे. म्हणूनच त्याची रंगीत तालीम संजय राऊत (Sanjay Raut) आणि उबाठाने (Uddhav Thackeray Group) सुरू केली आहे. रोज रडक्या पोपटासारखे रडगाणे गात आहेत, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी संजय राऊत आणि उबाठा यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजू वाघमारे म्हणाले की, मतदानाची सर्व काळजी निवडणूक आयोग घेत असतो. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे. हजारो निवडणूककेंद्राच्या हजारो मशिन्स एकाच वेळी काम करत असतात. त्या वेळेस काही वेळा त्या बंद सुद्धा पडू शकतात. शेवटी यंत्र आहे ते. पण निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मशिन्स बंद पाडण्यास सांगणे हे बालीश विधान विरोधक करताहेत, हे संजय राऊत आणि उबाठा करताहेत हे अतिशय हास्यास्पद आहे.

राजू वाघमारे म्हणाले की, संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, संजय राऊत ज्योतिषी झालेत हे मला माहित नव्हते. कारण उबाठाला जिथे मतदान होणार होते तिथे मशिन्स बंद केल्या असे आरोप आमच्यावर करत आहेत. पण कुठल्या विभागात कुणाला किती मते मिळतात हे कुणीच सांगू शकत नाही, असे असते निवडणुका झाल्याच नसत्या. म्हणून संजय राऊत यांनी विधाने चुकीची आहेत ते एक भोंदू ज्योतिषी आहेत.

राजू वाघमारे म्हणाले की, थांबलेल्या नालेसफाई बाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना राजू वाघमारे म्हणाले की, मुंबईतील नालेसफाईचे काम निवडणुकीपूर्वी महापालिकेने घेतले होते. पण आता निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे ते लवकरच पुन्हा सुरू होईल. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, असा विश्वास राजू वाघमारे यांनी दर्शवला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img