3.5 C
New York

Pune : पुण्यातील अपघात प्रकरणात पोलिसांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Published:

मुंबई

पुण्यातील (Pune) प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आणि ब्रह्मा क्रॉपचे संचालक विशाल अग्रवाल (Vedant Agarwal) यांचा मुलाच्या गाडीने 19 मे रोजी पुण्यातील (Accident) कल्याण नगर (Kalyani Nagar Accident) मध्ये तरुण आणि तरुणीला चिरडले होते. या प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) आरोपीला तत्काळ जामीन दिल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत होता. आता या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हस्तक्षेप करत पुणे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहे.

पुणे शहरात झालेल्या अपघातामध्ये आरोपीला जामीन देण्यात आला होता. 19 मे रोजी झालेल्या या अपघातामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया या दोन तरुण-तरुणींचा मृत्यू झाला होता. पुण्यातील बिल्डरच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून 2 जणांचे जीव घेतल्याच्या घटनेत कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात कुणालाही पाठिशी न घालता, राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोनवरून दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनांपाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनी देखील कडक भूमिका घेतली आहे.

नेमका अपघात कसा घडला?
वेदांत अगरवाल हा रविवारी पहाटे त्याच्या मित्रांसोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परत जात होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या,दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या कार चालकाने त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी हयगयीने, निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवत अनिस अवधिया याच्या दुचाकीला (एम.एच. 14 सी क्यु 3622) पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने वाहनचलाक वेदांतला पकडून चोप दिला.

वेदांत हा ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा आहे. दरम्यान, आपल्या भौतिक सुखातील धुंदीत वेदांतने भरधाव वेगाने कार चालवून काहीही चूक नसलेल्या दोघांचा बळी घेतला. त्यामुळे, अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img