19.7 C
New York

Pune Accident : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोन हॉटेलना टाळे

Published:

पुणे/प्रतिनिधी
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात (Pune Accident) प्रकरणाची गंभीर दखल घेत एक्साईज (Exise Department) विभागाने हॉटेल कोझी (Hotel Kozy) आणि हॉटेल ब्लॅकला (Hotel Black) टाळे ठोकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.
अपघातातील महागडी इंपोर्टेड पोर्श्चे गाडी मुंबईतील डिलरने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण न करता विशाल अगरवाल यांना दिली. त्यामुळे डीलरच्या ट्रेड सर्टिफिकेटवरही कारवाई होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले.

हेही वाचा : विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Pune Accident : कारला अधिकृत क्रमांक मिळालेला नाही


भोर म्हणाले, “विशाल अगरवाल यांनी अपघातग्रस्त आलिशान कार परराज्यातून आणली आहे. त्याकरिता तात्पुरते रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर त्यानंतर मागील दोन महिन्यांचा कर भरला नसल्याने कारला अधिकृत क्रमांक मिळालेला नाही. कारची विक्री महाराष्ट्रात झाली असती तर गाडीची रीतसर नोंदणी झाली असती. हि कार परराज्यातून आणल्याने त्या राज्यासाठी तेथील डीलर तात्पुरते रजिस्ट्रेशन करुन देत असतो. या तात्पुरत्या रजिस्ट्रेशनवर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गाडी नेता येते, पण ती रस्त्यावर फिरवण्यासाठी त्या राज्यात स्वतंत्र नोंदणी करणे बंधनकारक आहे. विशाल अग्रवाल यांनी मार्चमध्ये रजिस्ट्रेशनचे पैसे भरले. गाडी निरिक्षकाला दाखवली होती. मात्र, कारचा कर न भरल्याने तिची नोंद झाली नाही. जोपर्यंत गाडी मालक गाडीचा कर भरत नाही तोपर्यंत त्याला नोंदणी क्रमांक मिळत नाही.


 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img