23.1 C
New York

Pune Accident : देवेंद्र फडणवीसांकडून गाडीबाबत मोठा खुलासा

Published:

पुणे

पुण्यातील हिट अँड रनच्या (Pune Accident) घटनेची गंभीर दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज थेट पुणे पोलिस आयुक्त (Pune Police) कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी आढावा घेतला. ही घटना अतिशय गंभीर असून, कुणालाही सोडणार नाही, असा इशारा देतानाच स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

पुण्यात घडलेली अपघाताची घटना ही मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. आरोपीने दारुच्या नशेत संबंधित कृत्य केलं. आरोपी हा दोन ठिकाणी पार्टी केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दारु, पबवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी दोन पबच्या मालकांना अटकदेखील केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पोहोचताच, पोलिस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय तपास झाला, पुढची कार्यवाही काय आणि यापुढे अशा घटना घडू नये, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी या घटनेत भादंविचे 304 हे कलम लावले आहे, 304 अ लावलेले नाही. त्यामुळे प्रारंभीच कठोर भूमिका घेण्यात आली. या प्रकरणातील मुलगा हा 17 वर्ष 8 महिन्याचा आहे. पण, निर्भया प्रकरणानंतर जे बदल कायद्यात झाले, त्यानुसार, गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलाला सुद्धा सज्ञान मानण्यात यावे, अशी तरतूद आहे. तसेही पोलिसांनी आपल्या पहिल्याच अर्जात नमूद केले आहे. पण, बाल न्यायाधिकरणाने पोलिसांची भूमिका ऐकून घेतली नाही. त्यांनी सामाजिक सुधारणांसंबंधीचे आदेश दिले आणि त्यातून आणखी जनक्षोभ झाला. पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बाल न्यायाधीकरणाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे कायद्यानुसार, ती कार्यवाही करण्यात येत आहे. वरिष्ठ न्यायालयाने घेतलेली भूमिका पाहता निश्चितपणे बाल न्यायाधीकरण फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणालाही दारु पिऊन, बिनानंबरची गाडी चालविण्याचा आणि लोकांचे जीव घेण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात न्याय निश्चितपणे होईल. बारचे जे परवाने देण्यात आले, तेथे परवान्यातील अटींचे पालन होते की नाही, हे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जे अटींचे पालन करीत नसतील, ते बार बंद करण्यात येतील. शिवाय वय आणि ओळख याची पडताळणी केल्यानंतरच बारमध्ये प्रवेश दिला पाहिजे, याचेही काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. नाकाबंदी करुन ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहीम नियमितपणे राबवावी, याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पालकांनी सुद्धा स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. बाल न्याय मंडळाच्या पुढच्या आदेशानुसार याप्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच पोलिसांकडून कोणती वेगळी वागणूक मिळाली असेल तर सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या पोलिसांना बडतर्फ करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणाने लोकवस्तीच्या ठिकाणी बार असल्याचं दिसून आलं. आयडेंटिटी न करता आत सोडलं जात आहे. मोठ्या प्रमाणात ज्या भागात अशा प्रकारचे बार आहेत तिथे नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्हबाबत इफेक्टिव्ह अॅक्शन घेतली जाणार आहे. ज्यांना लायसन्स मिळाले आहेत, ते अटी पाळत आहेत की नाही याची तपासणी केली जाणार आहे. पोलीस हे काम करतील. त्याचबरोबर महापालिका आणि एक्साईज डिपार्टमेंट पाहणार आहे. कोणत्याही प्रकारचं नवीन लायसन्स देताना तो रहिवाशी भाग असू नये, तसेच त्याचे काटेकोर नियम असावेत. त्याची नोट मी पोलीस आयुक्तांना तयार करायला सांगितलं आहे. या प्रकारावर भविष्यात आळा आणता येईल यासाठी या खबरदारी घ्यावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही बाब सत्य आहे, ही गाडी बंगळुरूमध्ये विकत घेण्यात आली आहे. बंगळुरूहुन पुण्याला आणली, गाडी इकडे आल्यावर मालकांकडे काही कालावधी असतो की त्या काळात आरटीओकडे रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्यानुसार आता असलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरटीओचं इन्स्पेक्शन झालेलं आहे. पण त्यानंतर जो काही टॅक्स भरून नंबर प्लेट घ्यायची असते. मात्र तो भरला गेलेला नाही. त्यासंदर्भात वेगळे काही वॉयलेशन असेल तर त्यासंदर्भात वेगळा एफआयआर दाखल केला जाईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, रेसिडेन्शिअल परिसरातील पब्जबाबत धोरण आणणार आहे. त्यांना नियमावली घालणार असून जिथे नियमभंग होतोय ते पब्ज बंद करण्याचे आदेश द्या. जे लोक बार किंवा पबमध्ये जातात त्यांच्याकडे लिगल डॉक्यूमेंट आहे की नाही ते चेक करा. सीसीटीव्ही लावून चेक करा. पोलीस किंवा एक्साईज विभाग चेक करणार अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून लाँग टर्मसाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याचं फडणवीस म्हणाले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img